डाळिंबातील बी श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू 

Souravi
Souravi

सासुरे (सोलापूर) : साकत ( ता. बार्शी) येथील रहिवासी व वैराग येथे कार्यरत असलेले दंत चिकित्सक डॉ. संदीप घोरपडे व डॉ. राजश्री घोरपडे या डॉक्‍टर दाम्पत्याच्या साडेतीन वर्षांच्या मुलीचा डाळिंब खाताना त्यातील बी श्वसन मार्गात अडकल्याने मेंदूवर जबर आघात झाला, त्यातच रविवारी सायंकाळी सहा वाजता त्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

सौरवी घोरपडे असे तिचे नाव असून, ती डॉ. घोरपडे दाम्पत्याची मोठी मुलगी आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी ती तिच्या आईबरोबर लातूर येथे तिच्या मामाकडे गेली होती. तिथे डाळिंब खाताना त्यातील बी श्वसन मार्गात अडकल्याने तिच्या मेंदूवर जबर आघात झाला. त्यानंतर तिच्यावर लातूर व नंतर सोलापूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, 12 दिवसांनंतरही या उपचारास प्रतिसाद न दिल्याने तिला अखेर शुक्रवारी वैराग येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रविवारी सायंकाळी सौरवीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे वैरागच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये व नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com