धक्‍कादायक ! नातवंडांसह पोटच्या मुलीने निराधार आईला मारहाण करीत घराबाहेर हाकलले 

4images_574 - Copy.jpg
4images_574 - Copy.jpg

सोलापूर : वय झाल्याने थकलेली आई, पतीचा काही वर्षांपूर्वी झालेला मृत्यू, त्यामुळे आईला पोटच्या मुलीचाच आधार होता. थकलेल्या आईला मुलीने दोनदा हाकलून देऊनही मुलीच्या ओढीने अन्‌ जीवाच्या अकांताने आई पुन्हा मुलीकडे गेली. मात्र, पोटच्या मुलीने व तिच्या मुलांनी (नातवंडे) चिडून तू पुन्हा घरात का आली म्हणून शिवीगाळ करीत मारहाण करुन घराबाहेर हाकलून दिल्याची घटना विजयपूर रोडवरील नरेंद्र नगरात घडली आहे. त्यानंतर मंगळवारी (ता. 25) चनव्वा बिराजदार यांनी विजापूर नाका पोलिस ठाणे गाठले आणि मुलगी व नातवंडांविरुध्द फिर्याद दिली.
 

विजयपूर रोडवरील नरेंद्र नगरात आई मुलीसोबत राहायला होती. निराधार चनव्वा काही दिवस मुलीकडेच राहत होत्या. मात्र, त्या वयस्क झाल्याने काही काम करता येत नव्हते. त्यामुळे आईचा सांभाळ करणे शक्‍य नसल्याने पोटच्या मुलीने आठ महिन्यांपूर्वी आईला घरातून हाकलून दिले. मुलीचा राग कमी झाला असेल, नातवंडे आजीला घरात घेतील, या आशेने आई चनव्वा तिपण्णा बिराजदार (वय- 81) मुलगी निलव्वा भिमराव बिराजदार (रा. नरेंद्र नगर) हिच्याकडे 25 ऑगस्टला पुन्हा गेली. त्यांनी मुलीकडे घरातील त्यांची पिशवी व कपडे मागितले. थकवा आल्याने चहा करुन दे, असेही त्या मुलीला म्हणाल्या. त्यावेळी तू पुन्हा घरी का आली म्हणून मुलगी चनव्वा आणि त्यांच्या मुलांनी ज्योती भिमराव बिराजदार, विजयालक्ष्मी बिराजदार, संतोष बिराजदार यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वी दोनवेळा दिले होते हाकलून
पोटच्या मुलीने घराबाहेर हाकलून दिल्याने सात महिने आई चनव्वा या डॉ. नानासाहेब अर्जून यांच्याकडेच राहत होत्या. त्यांनीच चनव्वा यांना आधार दिला. मात्र, मुलीच्या ओढीने 17 जुलै 2020 रोजी चनव्वा पुन्हा मुलीकडे गेल्या. त्यावेळीही मुलीने आईला घरात येऊ न देता बाहेर हाकलून दिले. कोणताही आधार नसलेली आई 25 ऑगस्टला पुन्हा मुलीकडे गेली. पिशवी आणि कपडे दे, अशी मागणी त्यांनी मुलीकडे केली. मात्र, त्यांना पुन्हा तोच अनुभव आला. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरुध्द ज्येष्ठ नागरिक अधिनियम 2007 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com