डिसले गुरुजींकडून अमेरिकेतील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची घोषणा

डिसले गुरुजी
डिसले गुरुजीsakal
Updated on: 
Summary

गेल्या काही काळापासून वादात अडकलेले ग्लोबल टीचर डिसले गुरुजींनी आता एका स्कॉलरशिपची घोषणा केली आहे.

सोलापूर - ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळाल्यानंतर रणजितसिंह डिसले गुरुजींची जोरदार चर्चा झाली. दरम्यान, त्यांनी फुलब्राइट शिष्यवृत्तीसाठी मागितलेल्या रजेनंतर त्यांच्यावर काही आरोप झाले. यानंतर त्यांनी माफीही मागितली. रणजितसिंह डिसले यांनी क्यू आर कोडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली. त्यांनी केलेल्या या संशोधनासाठी ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळाला. याच पुरस्कारातून त्यांनी आता स्कॉलरशिपची घोषणा केली आहे.

डिसले गुरुजींना ग्लोबल टीचर पुरस्कारासोबत सात कोटी रुपये इतकी रक्कम जाहीर झाली होती. यातील अर्धी रक्कम स्पर्धेतील इतर ९ शिक्षकांना देण्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यानंतर आता त्याच रकमेतून त्यांनी अमेरिकेतील निर्वासित आणि स्थलांतरित विद्यार्थ्यांकरिता द झुलके-डिसले एज्युकेटर स्कॉलरशिप सुरु करण्यात आली आहे. याची माहिती डिसले गुरुजींनी ट्विटरवरून दिली आहे. या स्कॉलरशिपसाठी असलेले नियम आणि अटीही त्यांनी सांगितल्या आहेत.

डिसले गुरुजी
ग्लोबल गुरुजी, तुम्हीसुद्धा...?

डिसले गुरुजी आणि झुलके या दोघांनी ही शिष्यवृत्ती सुरु केली आहे. झुलके या नॉर्थ डकोटा ऑफ द इयर २०१८ पुरस्कार प्राप्त शिक्षिका आहेत. शिक्षणाची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना त्या मदत करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Drought Relief 2026 Farmers May Get Compensation Before Diwali Check Required Documents and Application Details
Shardiya Navratri Begins in Maharashtra with Ghatasthapana at Tuljapur Mahur Kolhapur and Saptashrungi Temple
Solapur Temperature Touches 38°C as Farmers Await Rain
The silver padukas footwear were stolen from this very spot in the temple
Marathi News Esakal
www.esakal.com