बोकडाचे जेवण अंगलट; अनेक जण स्वतःहून क्वारंटाइन 

बोकडाचे जेवण अंगलट; अनेक जण स्वतःहून क्वारंटाइन 
Updated on

पंढरपूर (सोलापूर) : तालुक्‍यातील भीमा नदी काठच्या गावात एका कुटुंबाकडे आयोजित केलेल्या बोकडाच्या जेवणावर अनेकांनी ताव मारला अन्‌ दुसऱ्या दिवशी या जेवणासाठी खास मंगळवेढा येथून आलेल्या तीन पाहुण्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जेवणासाठी गेलेले अनेकजण अस्वस्थ झाले असून त्यापैकी अनेकांनी स्वतःहून घरात क्वारंटाइन करुन घेतले आहे. 
या प्रकाराची समजलेली माहिती अशी की, तालुक्‍यातील भीमा नदी काठावरील एका गावात शुक्रवारी एका कुटुंबाच्या घरी बोकडाच्या जेवणाचा कार्यक्रम होता. त्यासाठी गावातील लोकांच्या बरोबरच मंगळवेढा येथून तीन जण खास पाहुणे आले होते. जेवणासाठी शंभराच्या आसपास लोकांनी उत्साहाने हजेरी लावली. उपस्थित मंडळी बोकडा खाऊन तृप्त होऊन आपआपल्या घरी गेली अन्‌ दुसर्ऱ्या दिवशी (शनिवारी) मंगळवेढा येथून जेवणासाठी आलेल्या तीन पाहुण्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची चर्चा सुरु झाली. एकाकडून दुसऱ्याला करत करत जेवणासाठी आलेल्या सर्वांना ही माहिती मिळाली आणि सगळ्यांच्या मनात धडकी भरली. तेरी भी चूप मेरी भी चूप म्हणून मग जेवणासाठी आलेल्या सगळ्यांनीच घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या या गावात बोकडाच्या जेवणामुळे संबंधितांच्या संसर्गामुळे जेवणासाठी गेलेल्या लोकांना लागण झाली तर नसेल ना या भितीने गावकरी चिंतेत आहेत. 
पंढरपूर शहर आणि तालुक्‍याच्या ग्रामीण भागात दररोज रुग्णांची संख्या वाढत असताना असे प्रकार घडले तर प्रशासनाची डोकेदुखी आणखी वाढत आहे. पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या व्यक्तींचे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग करणे, त्याची यादी बनवून संबंधितांना क्वारंटाइन करणे, पुढे गरज पडल्यास त्यांच्या तपासण्या करणे असे मोठे कामच प्रशासनाच्या मागे लागत आहे. 
बोकडाचे जेवणासाठी उपस्थित असलेल्या काही व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आमच्याही कानावर आली आहे. या विषयी तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण अवचर यांच्याशी बोलणे झाले असून ते चौकशी करत आहेत. या पुढे असे प्रकार घडू नयेत म्हणून प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. तालुक्‍यात रुग्ण वाढत असल्याने यापुढच्या काळात अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी सकाळ शी बोलताना दिली. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Council Election Strategy in Action: BJP Mobilizes Corporators, Ensures Early Voting
Court Battle Looms Over Chemical Treatment of Vitthal-Rukmini Idol in Pandharpur
solapur
MLA Devendra Kothe  
Marathi News Esakal
www.esakal.com