Solapur News : अर्धा-एक तासात तो घरी जाणार होता. त्यावेळी काही शेळ्या महामार्गावर येत असल्याने त्यांना बाजूला करण्यासाठी नैतिक महामार्गाजवळून धावत होता. त्याचवेळी केगावकडून हत्तूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने नैतिकला जोरात धडक दिली.
Scene of the tragic accident where a young shepherd boy lost his life after being hit by a truck.Sakal
सोलापूर : केगाव-हत्तूर बायपासजवळ कवठे (ता. उत्तर सोलापूर) गावाजवळील संत बाळूमामा मंदिर परिसरात शेळ्या राखणारा अल्पवयीन मुलगा ट्रकच्या धडकेत ठार झाला आहे. नैतिक राम माने (वय १७, रा. कवठे) असे मृताचे नाव आहे.