वैराग : आम्ही पोलिस आहोत. पुढे पोलिसांची तपासणी सुरू आहे, असे सांगत दोन तरुणांनी दुचाकीवरून येऊन सेवानिवृत्त सैनिकाच्या पत्नीला व नवविवाहिता अशा दोघींचे सुमारे चार तोळ्यांचे दागिने लंपास केले. याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्यात दोन दिवसांतील ही दुसरी घटना असल्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.