
Solapur: दहावी पास विद्यार्थ्यांपासून पदवी, पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच जिल्ह्यात, शहरात नोकरी तथा रोजगाराची संधी मिळावी. यासाठी आता शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावे घेतले जात आहेत. प्रत्येक तीन महिन्यातून एकदा हा रोजगार मेळावा जिल्ह्याच्या ठिकाणी होतो आणि वर्षातील चार मेळाव्यातून किमान १० हजार तरुणांना रोजगार, नोकरीची संधी मिळते.