esakal | सर्वच शिक्षकांसाठी आनंदाची बातमी ! एप्रिलमध्ये 'एवढ्या' दिवस मिळणार सुट्टी

बोलून बातमी शोधा

03School_20fb_20_20Copy_2.jpg

राज्यात 15 अथवा 16 एप्रिलच्या रात्री आठ वाजल्यापासून 1 मेच्या सकाळी आठ वाजेपर्यंत कडक लॉकडाउन असेल, अशी विश्‍वसनीय सूत्रांची माहिती आहे. या काळात सर्वच शिक्षकांना सुट्टी दिली जाणार आहे. मात्र, ज्यांच्यावर कोरोनासंबंधीच्या कामाची जबाबदारी आहे, त्यांना सुट्टी मिळणार नाही, असे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी सकाळशी बोलताना सांगितले. सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांना ऑनालाइन शिक्षण देणे शिक्षकांसाठी बंधनकारक असेल, असेही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले. 

सर्वच शिक्षकांसाठी आनंदाची बातमी ! एप्रिलमध्ये 'एवढ्या' दिवस मिळणार सुट्टी
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : राज्यात 15 अथवा 16 एप्रिलच्या रात्री आठ वाजल्यापासून 1 मेच्या सकाळी आठ वाजेपर्यंत कडक लॉकडाउन असेल, अशी विश्‍वसनीय सूत्रांची माहिती आहे. या काळात सर्वच शिक्षकांना सुट्टी दिली जाणार आहे. मात्र, ज्यांच्यावर कोरोनासंबंधीच्या कामाची जबाबदारी आहे, त्यांना सुट्टी मिळणार नाही, असे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी सकाळशी बोलताना सांगितले. सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांना ऑनालाइन शिक्षण देणे शिक्षकांसाठी बंधनकारक असेल, असेही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले. 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत असून ऑक्‍सिजन, रेमडेसिव्हिर, ऑक्‍सिजन बेड, व्हेंटिलेटर, आयसीयू खाटा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाची दुसरी लाट रोखण्याच्या हेतूने 15 दिवसांचा लॉकडाउन केला जाणार आहे. या काळात सोलापूर राज्यभरातील सर्वच शाळा बंद राहणार आहेत. शिक्षकांनाही सुट्टी देण्याचा निर्णय शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना विशेषत: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाइन शिक्षण देणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनासंबंधी कामाची जबाबदारी ज्या शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. त्यांना मात्र, सुट्टी मिळणार नाही.

विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देणे बंधनकारक
कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे राज्यात लॉकडाउन होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर-जिल्ह्यातील सर्वच माध्यमिक शाळा बंद राहतील. परंतु, या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देणे शिक्षकांसाठी बंधनकारक असेल. 
- भास्कर बाबर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत शालेय शिक्षण विभागाने पहिली ते आठवीपर्यंतच्या एक कोटी 46 लाख 86 हजार 493 विद्यार्थ्यांना थेट पुढच्या वर्षात प्रवेश दिला. त्यानंतर नववी ते अकरावीची मुले पुढच्या महत्त्वाच्या वर्गात प्रवेश करणार असल्याने त्यांची परीक्षा घेतली जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी वारंवार स्पष्ट केले. मात्र, कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे, त्यांच्यादृष्टीने सुरक्षित वाटत नव्हते. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील नववी व अकरावीच्या वर्गातील 31 लापख 20 हजार 41 विद्यार्थ्यांनाही थेट पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात आला. आता दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शाळाही बंदच असून आता कोरोनाच्या निर्बंधानुसार शाळेत शिक्षकांची 50 टक्‍केच उपस्थिती बंधनकारक आहे. या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनमध्ये सर्व शाळाच बंद राहणार असल्याने शिक्षकांना शाळेत येण्याची गरज नाही, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.


 
लॉकडाउननंतर दहावी-बारावीचे वर्ग सुरु होतील
कोरोनाच्या विषाणूची साखळी खंडीत करण्याच्या हेतूने लॉकडाउन केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर दहावी-बारावीच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकून राहावी, त्यांच्या मनातील कोरोनाची भिती दूर करणे, त्यांना शिकविलेला अभ्यासक्रम पुन्हा समजावून सांगण्याची प्रमुख आव्हाने पुढील काळात शिक्षकांसमोर असतील. त्यानुसार कृती आराखडा तयार करून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. लॉकडाउन संपुष्टात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने मुख्याध्यापक त्यांच्या गावातील दहावी-बारावीचे वर्ग सुरु करू शकतात, असेही माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. बाबर म्हणाले.