नातेपुते, (जि. सोलापूर) - ‘शरद पवार यांना बॅलेट पेपर हवे का नकोत? या वादात धनगर समाजाला पुढे का केले आहे? हे पाप शरद पवार यांनी केले आहे. धनगर समाज कायदा मानत नाही, हे दाखवण्यासाठी हे षड्यंत्र आहे,’ असा घणाघाती आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला..मारकडवाडी (ता. माळशिरस) येथे ईव्हीएम नको बॅलेट पेपर हवा याविषयी चाललेल्या आंदोलनात महाविकास आघाडीचा पर्दापाश करण्यासाठी आज आ. गोपीचंद पडळकर, आ. सदाभाऊ खोत आणि माजी आमदार रामभाऊ सातपुते यांची जाहीर सभा झाली.यावेळी मारकडवाडी व पंचक्रोशीतील तसेच माळशिरस तालुक्यातील ग्रामस्थ, महायुतीचे कार्यकर्ते या सभेला हजर होते. गोपीचंद पडळकर शरद पवार यांना उद्देशून म्हणाले, ‘संसद भवन, राष्ट्रपती भवन हे होळकरांच्या जमिनीवर उभे आहे. धनगर समाज संविधानासोबत राहतो. विनाकारण धनगर समाजाला बदनाम करू नका..तुमच्यात हिंमत असेल तर पहिला राजीनामा सुप्रिया सुळे, नातू रोहित पवार, जयंत पाटील या तिघांचा घ्या. राहुल गांधी, प्रियांका यांनी राजीनामा द्यावा. आमच्या समाजाला बळीचे बकरे करू नका. आपण २००९ साली माढा लोकसभेचे प्रतिनिधी होता. तेव्हा या तालुक्यात एक तरी काम केले का हे सांगा.तेव्हा या गावाला भेट दिली का? आता भेट देण्याचे कसे सुचले? यातून धनगर समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. संविधानाने राजा आणि पोतराज एकाच पातळीवर आणून ठेवले आहेत. जयंत पाटील परदेशात शिकून आले आहेत. त्यांनी मशीन हॅक असल्याचे सिद्ध करून दाखवावे. त्यांना एकशे एक रुपये बक्षीस देतो.’’.ते म्हणाले, ‘राज्यात चमत्कार झाला कारण केंद्र आणि राज्यातील अनेक योजना लोकांना आवडल्या. विशेषतः लाडकी बहीण, शेतीला मोफत वीज, कोतवालांचा पगार वाढवला, पोलिस पाटलांचे मानधन वाढवले, एक रुपयात विमा उतरवला. अशा आंदोलनाने चुकीचा पायंडा पाडू नका. गावागावात ठराव घ्या आणि बॅलेट पेपर कसे चुकीचे आहेत हे सांगा. प्रस्थापित जात सर्वात भित्री असते. ते प्रशासनाला पुढे करून जगतात. आंदोलन मोडीत काढायच असेल तर सर्वांनी एक राहिले पाहिजे..राम सातपुते म्हणाले, ‘मोहिते पाटलांच्या गुंडांनी मारकडवाडीकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर साखर कारखान्याचे कामगार उभे करून सभेला कोण कोण येते, याची नोंद केली. तरी हे साखळदंड तोडून आज हजारो लोक आलेले आहेत. तालुक्यात स्वतःला चाणक्य म्हणून घेणार जयसिंह मोहिते पाटील हे स्वतःच्या पोराला पराभवापासून वाचवू शकले नाहीत. ते भाजपला पराभूत करायचे स्वप्न पाहत आहेत.सुमित्रा पतसंस्था, विजय पतसंस्था, सोलापूर जिल्हा बँक यांनी बुडविली आहे. यांच्या साखर कारखान्याला इतर कारखान्यांना पेक्षा ७०० रुपये दर कमी आहे. लोकांनी उत्तम जानकरांना नाकारले आहे. कारण ते मोहिते-पाटलांच्या गटात सामील झाले आहेत. या सर्वांना वर्षाच्या आत मी जेलमध्ये टाकणार आहे. शिवरत्न कंन्स्ट्रक्शन कंपनीने तालुक्यातील कोट्यवधी रुपयाचा निधी खाल्ला आहे..लवकरच सदाशिव नगरच्या शंकर कारखान्यावर प्रशासक बसवणार आहोत. यशवंत नगर कारखान्याची ही चौकशी लावणार आहोत. मोहिते पाटलांची गुलामी या जनतेला मान्य नाही. रणजीत सिंह मोहिते पाटील हे डबल ढोलकी वाजवतात. त्यांना जनाची नाही, मनाची असेल तर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे. गद्दाराला माफी नको हे मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगावे.’ते म्हणाले, ‘मी लढणारा कार्यकर्ता आहे. २०२९ ला येथील आमदार भाजपचा असेल. जिथे कमी पडलो तेथे घरोघरी जाऊन काम करेन. मारकडवाडी इव्हेंटचे मास्टर माईंड रणजित सिंह मोहिते पाटीलच आहेत.’.आमदार सदाभाऊ खोत म्हणाले,‘‘येथील जनतेला मी दंडवत घालायला आलो आहे. तुम्ही इतिहास केला आहे. याची दखल देशाने घेतली आहे. राहुल गांधी येणार आहेत. त्यांचे मतदानासाठीच्या मांडवात लग्न लावून द्या. कारण त्यांनी शपथ घेतली आहे पंतप्रधान झाल्याशिवाय लग्न करणार नाही. इथे बॅलेट पेपरवर मतदान करा. त्यांना पंतप्रधान करा.२००४ ला ईव्हीएम मशीन आली. देशात आणि राज्यात त्यांनी दहा वर्षे सत्ता भोगली. मग आताच गडबड कशी होते. तुमची मुलगी लाखाने विजयी होते. नातू निवडून येतो मग त्यांना राजीनामा द्यायला लावा. लाडक्या बहिणींनी कमाल केली आहे. शेतकऱ्यांना वीज मोफत दिली आहे म्हणून महायुतीला सत्ता मिळाली आहे.’’.मारकडवाडीचे वातावरणसकाळपासून गावात ढोल, ताशा वादन सुरूहेलिपॅडपासून सभा स्थळी प्रमुख पाहुण्यांना बैलगाडीतून वाजत गाजत आणलेपाहुण्यांच्या एका हातात चाबूक, एका हातात ईव्हीएम मशीनसोनाली शिरतोडे हिचा बूथवर काम केल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानमारकवाडी गावात चौकाचौकात मोठे डिजिटल फलक उभारण्यात आले.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.