
सोलापूर : कोणत्याही मोबाईल ॲपवरून क्यु आर कोड स्कॅन करून नागरिकांना सुलभरीत्या तक्रार नोंदविण्याकरिता उपलब्ध करून दिल्यानंतर आजपर्यंत एकूण ८ तक्रारी क्यु आर कोड द्वारे नोंदविल्या गेल्या आहेत. या तक्रारीमधील १ तक्रारीबाबत अर्जदार यांना कळविण्यात आले आहे. उर्वरित प्रकरणांबाबत चौकशी अहवाल प्राप्त करून तक्रारीत तथ्य आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.