मंगळवेढा - प्रलंबित महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी एक महिन्याच्या आत नवीन समितीची निवड करून जागा निश्चिती बाबत जिल्हाधिकारी समवेत लोकप्रतिनिधीची बैठक घेऊन तोडगा काढू अशी आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
माढ्याचे आ. अभिजीत पाटील यांनी मंगळवेढ्यातील बसवेश्वर स्मारकासाठी मूळ प्रस्तावाला मान्यता द्यावी व स्मारक समिती अस्तित्वात नसल्याने समिती कधी स्थापन करणार या संदर्भातील तर आ. समाधान आवताडे यांनी देखील महात्मा बसवेश्वर व संत चोखोबा स्मारकाबाबत आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला होता. त्यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी हे उत्तर दिले.
मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक या व्हावे यासंदर्भात देशातील बसव भक्तांची मागणी होती. परंतु 2014 नंतर तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून या समितीने जवळपास 151 कोटीचा आराखडा राज्य शासनाला सादर केला.
त्यानंतर या स्मारकासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समिती नियुक्ती केली होती. त्या समितीचे काम सुरू होण्यापूर्वी समिती बरखास्त करण्यात आली. तर महाविकास आघाडी सरकारच्या काळातील तत्कालीन अर्थमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी स्मारकासाठी आवश्यक त्या निधीची घोषणा 2021 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली मात्र प्रत्यक्षात निधी दिला नव्हता.
आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माढ्याचे आ. अभिजीत पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित करत स्व.आ. भारत भालके व विद्यमान आ. समाधान आवताडे हे येथील सदस्य स्मारक व्हावे, यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. मात्र, अद्याप याला मंजुरी मिळाली नाही यापूर्वी 151 कोटीचा प्रस्ताव शासनाला सादर केला.
त्यानंतर 95.66 कोटी व 25 कोटी असे तीन वेगवेगळे प्रस्ताव सादर केले सदरचे स्मारक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्यामुळे सात कोटी बसवभक्त भविष्यात भेट देऊ शकतात तशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे मूळ प्रस्तावाला मान्यता देणे आवश्यक आहे याशिवाय 30 मार्च 2022 रोजी प्रांत कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयास जागेबाबतचा प्रस्ताव सादर केला.
मात्र तो प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित असल्याने या स्मारकाचे काम रखडले आहे. त्यामुळे बसवेश्वर स्मारकासाठी स्मारक समिती कधी स्थापन करणार असा प्रश्न उपस्थित करून दोन दिवसात नव्याने समिती स्थापन करावी अशी मागणी या अधिवेशना दरम्यान केली.
तत्पूर्वी आमदार समाधान आवताडे यांनी देखील याबाबतचा प्रश्न उपस्थित करत सत्ताधारी पक्षाला त्याबाबत विचारणा केली सोलापूरचे पालकमंत्री व त्या खात्याचे मंत्री जयकुमार गोरे असल्यामुळे स्मारकाचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा वाढल्या.
मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक व्हावे ही बसव भक्ताची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. त्यासाठी काँग्रेसचे तत्कालीन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या समवेत मुख्यमंत्री यांटी भेट देऊन मागणी केली होती. परंतु तरीही त्याकडे दुर्लक्ष झाले. परंतु प्रलंबित प्रश्नाला वाचा फोडल्याने निदान तो प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित या निमित्ताने समजले.
- प्रशांत साळे, तालुकाध्यक्ष काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.