
सोलापूर ही वस्त्रोद्योग नगरी आहे. आज वस्त्रोद्योगाला चांगले दिवस आहेत. त्याचा फायदा घेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने वस्त्रोद्योगाविषयी विविध अभ्यासक्रम, प्रकल्प तसेच उपक्रम सुरू करून वेगळे नाव निर्माण करावे, असे प्रतिपादन राज्याचे महामहिम राज्यपाल तथा सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती श्री सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.