
सोलापूर : आवास योजनेतील २६९ चौरस फुटाच्या घरकुलासाठी जिल्हा दरसुचिनुसार सव्वादोन लाखांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. मात्र, लाभार्थींना एक लाख २० हजार रुपयांपर्यंतच अनुदान होते. त्या निर्णयात बदल करून राज्य सरकारने घरकूल लाभार्थींचे अनुदान ५० हजाराने वाढविण्याचा निर्णय घेतला. पण, बजेटमध्ये त्याची तरतूद नसल्याने अद्याप लाभार्थींना वाढीव अनुदानाची रक्कम मिळालेली नाही.