esakal | भावजयीच्या खूनप्रकरणी दिराला जामीन मंजूर
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

भावजयीच्या खूनप्रकरणी दिराला जामीन मंजूर

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : हन्नूर नाका (ता. अक्कलकोट) येथील पुतळाबाई शिवराज मलगोंडा हिचा खून केल्याप्रकरणी दिर देवराज बसवराज मलगोंडा याला जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.डी. खेडेकर यांनी जामीन मंजूर केला.

मयत पुतळाबाई व शिवराज यांचे लग्न सन 2006 साली झाले होते. पुतळाबाईच्या सासरी मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी असल्याने तसेच तिचा नवरा शिवराजला दारूचे व्यसन होते. त्यामुळे प्रॉपर्टीचे काम दीर देवराज पाहत होता. शिवराज व देवराज व जाऊ गंगोत्री हे प्रॉपर्टी वाटून देणार नाही, तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वेळोवेळी मारहाण व शिवीगाळ देखील केली होती. 30 जून 2020 रोजी शिवराज, देवराज व जाऊ गंगोत्री यांनी संगनमत करून पुतळाबाईच्या नाका-तोंडावर उशी सारख्या वस्तूने दाब देऊन ठार मारले, अशी फिर्याद पुतळाबाईचा भाऊ बसवराज मल्लिनाथ शेळके यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून देवराजला अटक झाली. देवराजने ऍड. मिलिंद थोबडे यांच्यामार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला.

ऍड. थोबडे यांनी अर्जदार हा मयत पुतळाबाई हिच्यापासून वेगळे राहतो. तसेच अर्जदार व मयत पुतळीबाई यांच्यात प्रॉपर्टीबाबत कोणताही वाद कोर्टात प्रलंबित नाही. त्यामुळे अर्जदाराने पुतळाबाईचा खून केला, असे म्हणता येणार नाही, असा युक्तिवाद केला. तो मान्य करून न्यायालयाने अर्जदाराचा 25 हजारांच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला. या प्रकरणात संशयित आरोपीतर्फे ऍड. थोबडे, ऍड. विजय हर्डीकर, ऍड. विनोद सूर्यवंशी यांनी तर सरकारतर्फे ऍड. दत्ता पवार यांनी काम पाहिले.

loading image
go to top