प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सांगोलाच्या लाभार्थींना 1.42 कोटी अनुदानाचे वाटप 

Awas Yojana
Awas Yojana
Updated on

सांगोला (सोलापूर) :  प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना राज्य शासनाचे एक लाख व केंद्र शासनाचे एक लाख 50 हजार असे एकूण दोन लाख 50 हजारांचे अनुदान वितरित करण्याची तरतूद आहे. सांगोला नगरपरिषदेकडून बांधकाम सुरू असणाऱ्या लाभार्थींना राज्य शासनाचा एक लाखाचा हप्ता यापूर्वीच वितरित करण्यात आला आहे. परंतु, केंद्र शासनाच्या निधीअभावी योजनेतील घरकुलांची कामे रखडली होती. सांगोला नगरपरिषदेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाचा निधी नगरपरिषदेस प्राप्त झाला आहे. हा केंद्र शासनाचा हिस्सा पात्र लाभार्थींच्या बॅंक खात्यावर थेट जमा करण्यात आला आहे. एकूण 161 लाभार्थींना त्यांच्या बांधकामाच्या टप्प्यानुसार एकूण 1 कोटी 42 लाख 40 हजार रुपये अनुदानाचे वितरण केल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली. 

सांगोला नगरपरिषदेस प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक हजार 606 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त असून, आजअखेर चार सविस्तर प्रकल्प अहवालातून एकूण 423 घरकुलांना शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. मंजूर घरकुलांपैकी 158 घरकुलांचे बांधकाम स्लॅब लेव्हलपर्यंत पूर्ण झाले आहेत. तसेच आजअखेर 64 घरकुले पूर्ण झाली आहेत. नगरपरिषदेमार्फत या निधीचे वितरण करण्यात आल्याने रखडलेली घरकुलांची कामे सुरू होऊन आर्थिक संकटात सापडलेल्या लाभार्थींमधून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच अद्याप ज्या लाभार्थींनी घरकुलांची बांधकामे सुरू केली नाहीत, अशा लाभार्थींनी त्वरित बांधकामास सुरवात करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी केंद्रे यांनी केले आहे. 

मागील काही महिन्यांपासुन केंद्र शासनाच्या निधीअभावी तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरकुलांची कामे थांबली होती. नगरपरिषदेस केंद्र शासनाचा निधी उपलब्ध झाला असून, अनुदान रक्कम लाभार्थींच्या खात्यावर तत्काळ जमा करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थींचे घरकुलाचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे 
- राणी माने, नगराध्यक्षा 

घरकुलांची बांधकामे पूर्ण झालेल्या लाभार्थींनी त्वरित नगरपरिषदेकडून वापर परवाना मिळवून योजनेचे नाव घरकुलांवर टाकून शेवटच्या हप्त्यासाठी अर्ज करावा, जेणेकरून अंतिम हप्ता नगरपरिषदेस लाभार्थींच्या खात्यावर जमा करणे सोईस्कर होईल 
- कैलास केंद्रे, मुख्याधिकारी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mohol Police conduct a route march across the city and Shetphal ahead of Ganeshotsav to maintain law and order.
Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
Marathi News Esakal
www.esakal.com