मंगळवेढा - भारतीय बाजारपेठेत नेपाळमार्गे होणाऱ्या बेकायदेशीर बेदाणा आयातीमुळे देशातील द्राक्ष शेतकऱ्यांच्या बेदाणा विक्रीवर परिणाम करत असल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होणार असून ही बेदाणा आयात थांबवावी, अशी मागणी तालुका काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अॅड. राहूल घुले यांनी निवेदनाव्दारे तहसीलदार मदन जाधव यांच्याकडे केली.