
सोलापूर : सोशल मीडियातील रिल्स अन् स्टोरीच्या जाळ्यात अडकलेल्या नव्या पिढीला प्रत्यक्षातील सर्कस फारशी माहिती नाही. महाराष्ट्रात कमी उरलेल्या सर्कसीपैकी ग्रेट राजकमल सर्कस सोलापुरात सुरू आहे. जुनी मिल कंपाउंड येथे या सर्कसचे रोज तीन खेळ होत असून, ५५ फुटावर हवाई झुला, हायस्पीड मोटारसायकल, जंप, इंडिया गॉट टॅलेंटचे विनर मणिपुरी ग्रुप त्याचबरोबर फायर ॲक्ट, हुल्लाहुप रिंग डान्स, अरेबियन डान्स, तलवार स्टंट आहे. खास लहान मुलांसाठी जोकरांचे विदुषी व हास्यास्पद मनोरंजन होत आहे.
ग्रेट राजकमल सर्कसमध्ये एकूण ८२ कलाकार असून ते आपापल्या कामगिरीत निपुण आहेत. प्रेक्षकांना कार्टुन्सबरोबर सेल्फी घेण्याची संधी आहे. राजकमल या सर्कसची सुरुवात २५ डिसेंबर १९६९ साली सोलापूर येथील लाडले साब शेख यांनी सुरु केली होती. आज त्यांच्या तिसऱ्या पिढीतील रफिक शेख ८२ जणांचे कुटुंब या सर्कसवर चालवत आहेत. सोलापुरातील वारद कंपाउंड येथे या सरकारचे प्रारंभिक खेळ झाले होते. गत ५६ वर्षांपासून या सर्कसची सेवा सुरू आहे. लाडलेसाब शेख यांचे नातू रफिक शेख यांनी सध्या या व्यवसायाची परंपरा सुरू ठेवली आहे.
सरकारने पाहावी गांभिर्याने आयुष्याची सर्कस
सन १९९८ पासून शासनाने सर्कसवर निर्बंध घालण्यास सुरुवात केली. सर्कसमध्ये बालकामगार, प्राण्यांना काम करण्यास शासनाने बंदी घातल्याने सर्कसवर मोठा परिणाम झाला आहे. घोडा, उंट यासारख्या देशी प्राण्यांना सर्कसमध्ये काम करण्यास परवानगी द्यावी, केरळ सरकारप्रमाणे महाराष्ट्र शासनाने सर्कसच्या कलाकारांना मानधन द्यावे अशी मागणी रफिक शेख यांनी केली.
रोजगाराच्या शोधात हसवणारेच रडकुंडीला
जगाला हसविण्याचे काम करणाऱ्या आमच्यावर आता रडायची वेळ आल्याचे या सर्कसमधील तीन फुटाचा जोकर बाबूलाल सांगतो. आतातरी शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला मदत करण्याची विनंती बाबूलाल करतो आहे. पूर्वी ज्या पद्धतीने सर्कस पाहायला मायबाप प्रेक्षक गर्दी करीत तसे चित्र आता राहिले नसून आम्ही जगायचे कसे हा प्रश्न असल्याचे गोपाळ खंडागळे हा झुल्यावर कसरत करणारा गोपाळ खंडागळे सांगतो. आम्ही १० लोकांचे कुटुंब जगवतो पण आता परिस्थिती खूपच अवघड बनत चालल्याचे राम हे कलावंत सांगतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.