Solapur Municipal Corporation: महापालिकेच्या अभिलेखापाल, बांधकाम आणि नगररचना विभागात नागरिकांची सर्वाधिक गर्दी असते. आठवड्याच्या सुरवातीला सोमवार आणि शेवटी शुक्रवारी प्रशासकीय विभागात नागरिकांची गर्दी वाढते..तर इतरवेळी ७०० ते ८०० नागरिकांची ये-जा असल्याचे महापालिकेच्या रजिस्टरच्या नोंदीवरून दिसून येते. महापालिकेची ऑनलाइन सुविधा असतानाही नागरिकांचा ऑफलाइन रेटा मात्र सुरूच असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते..Summer Flower Demand: उन्हाळ्यात फुलांची मागणी वाढली, किंमती शिखरावर; प्लास्टिक फुले आणि पुदिन्याच्या हारांचा ट्रेंड वाढला वेगात.महापालिका आयुक्तांनी प्रशासकीय विभागात येणाऱ्या नागरिकांची नोंद घेण्यासाठी प्रवेशद्वारावर दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या रजिस्टरमध्ये नाव आणि कोणत्या विभागात काम आहे, याची दैनंदिन माहिती नोंद केली जाते. सकाळी ९ ते सायंकाळी ६.३० पर्यंत वेगवेगळ्या कामानिमित्त व विविध विभागांत जाणाऱ्या नागरिकांची माहिती या माध्यमातून संकलित केली जात आहे. गेल्या महिनाभरात घेतलेल्या नोंदींवरून नागरिकांची कामे ही अभिलेखापाल, बांधकाम आणि नगररचना विभागामध्ये अधिक असल्याचे दिसून आले..एकीकडे नागरिकांचा वेळ आणि वाहतुकीचा खर्च वाचण्याबरोबरच नागरिकांना घरबसल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल २१ विभागांतील ६४ सेवा ऑनलाइन केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने जन्म-मृत्यू, कर आकारणी व बांधकाम विभागातील गर्दी कमी करणे हाच मुख्य उद्देश होता. मात्र प्रत्यक्षात सुविधा ऑनलाइन केल्या तरी तांत्रिक अडचणी, कागदपत्रांचा गोंधळ अशा अनेक कारणांमुळे अधिकाऱ्यांना भेटल्याशिवाय कामे होत नसल्याचे दिसून येते. ऑनलाइन सुविधा असल्या तरी दररोज सरासरी ८५० नागरिकांची प्रशासकीय इमारतीमध्ये वर्दळ असल्याचे दिसून येते..गर्दी होण्याची कारणे...- जुना जन्म-मृत्यू दाखला मिळण्यास विलंब- अभिलेखापाल विभागातील रेकॉर्ड गायब- जागेवरील अतिक्रमण, अनधिकृत बांधकामांकडे अधिकाऱ्यांचे सोयीने दुर्लक्ष त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींमध्ये वाढ- नवीन विकास आराखडा, ओपन स्पेस, शासकीय जागांवरील वाढत्या अतिक्रमणासंबंधी माहिती घेण्यासाठी नागरिकांची नगररचना विभागात रेलचेल वाढली आहेया आठवडाभरातील नागरिकांच्या नोंदी- सोमवारी : ९५० ते १०००- मंगळवारी : ७५० ते ८००- बुधवारी : ६५० ते ७००- गुरुवारी : ६५० ते ७००- शुक्रवारी : ८५० ते ९००.ऑनलाइन प्रणालीमध्ये सोलापूर महापालिका सर्वांत पुढे आहे. नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचविण्यासाठी ऑनलाइन प्रणाली आहे. प्रशासकीय इमारतीतील गर्दी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहोत. आठवडाभरापूर्वी ऑनलाइन प्रणाली अपडेट करण्याचे काम हाती घेतले होते. अपडेट होऊन काम सुरळीत सुरू झाले आहे.- डॉ. सचिन ओम्बासे, आयुक्त.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.