
बार्शी : विठोबाच्या पालखीची सेवा करण्याची संधी मिळाली, त्याप्रमाणेच श्री भगवंताची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. संकल्प करून जात असून २८६ कोटी रुपयांच्या तीर्थक्षेत्र आराखड्यास मंजुरी मिळेल. आमदार राजेंद्र राऊत नसले तरी काय झाले, सरकार त्यांच्या सोबत राहणार आहे. भगवंताच्या बार्शीला काहीही कमी पडू देणार नाही, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.