
सोलापूर : शहरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टी दूषित पाण्यामुळे मृत्यू झालेल्या शाळकरी मुलींच्या कुटुंबीयांची पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांत्वनपर भेट घेतली. तेथील परिस्थितीची माहिती घेऊन वैयक्तिकरित्या या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत दिली. तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अधिकाधिक मदत देण्याचे आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.