सव्वातीनशे वर्षांची परंपरा यंदा खंडित ! हुन्नूर येथील गुरू-शिष्य भेटीचा सोहळा रद्द 

Guru-Shishya
Guru-Shishya
Updated on

भोसे (सोलापूर) : महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांची तब्बल सव्वातीनशे वर्षांची परपंरा असलेल्या तालुक्‍यातील हुन्नूर येथील बिरोबा-महालिंगराया गुरू-शिष्याचा शुक्रवारी (ता. 6) होणारा भेटीचा सोहळा कोरोनाच्या पाश्वभूमीवर रद्द करण्यात आल्याची माहिती बिरोबा देवस्थान कमिटीचे सदस्य जगन्नाथ रेवे यांनी दिली. 

हुन्नूर येथील बिरोबा हे हुलजंतीचे महालिंगरायांचे गुरू असून सतराव्या शतकापासून दरवर्षी अश्विन वद्य सप्तमीला हुलजंती येथून हजारो भाविक महालिंगरायाची पालखी घेऊन हुन्नूरमध्ये गुरू बिरोबाच्या भेटीसाठी धावत - पळत येतात. सायंकाळी चार वाजता बस स्थानकाशेजारी भेटीच्या मैदानावर मुक्तपणे भंडारा, लोकर, खोबरे व ऊस आदींची उधळण करत लाखो भाविकांच्या साक्षीने हा भेटीच्या नयनरम्य सोहळ्याची परपंरा अखंडितपणे सुरू आहे. 

यंदा सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शुक्रवारी होणारी भेट रद्द करण्याच्या सूचना पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे व तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिल्याने हा भेटीचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. भाविकांनी या दिवशी हुन्नूरमध्ये नाहक गर्दी करू नये, असे आवाहन देवस्थान कमिटीच्या वतीनेही करण्यात आले आहे. 

याबाबत पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे म्हणाले, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासन व देवस्थान कमिटीत चर्चा करून भेटीचा सोहळा खबरदारीचा उपाय म्हणून रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या दिवशी हुन्नुरात पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवला जाणार असल्याने भाविकांनी विनाकारण हुन्नूर येथे गर्दी करू नये. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

muncipal corporation
solapur suside
बेशिस्त वाहनधारकांनो सावधान! वाहतूक पोलिसांच्या शर्टावर आता बॉडी वोर्न कॅमेरा
Maharashtra Guardian Minister Jaykumar Gore announced that the historic Shri Vitthal-Rukmini Temple at Khandali will be considered for pilgrimage status, aiming to boost religious tourism and local development.
Marathi News Esakal
www.esakal.com