Solapur News : 'हातभट्टीमुक्त गाव' साठी आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला पुढाकार! वर्षभरात 2067 गुन्हे दाखल

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महसुलाच्या संवर्धनाकरिता अवैध देशी-विदेशी दारू, हातभट्टी दारू, ताडी विक्री, निर्मितीवर सातत्याने कारवाई केली.
Hand kiln liquor
Hand kiln liquorsakal

सोलापूर - राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता शासनाने दिलेले महसुलाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. वर्षभरात अवैध दारूविरुद्ध राबविलेल्या मोहिमेत सहा कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महसुलाच्या संवर्धनाकरिता अवैध देशी-विदेशी दारू, हातभट्टी दारू, ताडी विक्री, निर्मितीवर सातत्याने कारवाई केली. सोलापूर जिल्ह्याला 2023-24 या आर्थिक वर्षासाठी शासनाकडून 166 कोटी 32 लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. 31 मार्चअखेर विभागाकडून 189 कोटी 60 लाखांचा (114 टक्के) महसूल शासन जमा करण्यात आला आहे.

वर्षभरात अवैध दारूविरुद्ध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे महसुलाचे उद्दिष्ट गाठणे शक्य झाल्याचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने 1एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये एकूण 2067 गुन्हे दाखल केले असून 1702 आरोपींना अटक केली.

मागील वर्षीच्या तुलनेत 2023-24 या आर्थिक वर्षात गुन्ह्यांच्या नोंदीत व मुद्देमालात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी राज्यभरात "हातभट्टीमुक्त गाव" अभियान प्रभावीपणे राबविले जात असून त्या अनुषंगाने सोलापूर विभागाकडून 2023-24 मध्ये हातभट्टी निर्मितीचे 668, हातभट्टी दारु विक्रीचे 418 व हातभट्टी दारू वाहतुकीचे 134 गुन्हे नोंदविले आहेत.

हातभट्टीमुक्त गाव अभियान प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरातील तालुकानिहाय व पोोलि स्टेशननिहाय हातभट्टी दारु ठिकाणांचे मॅपिंग करण्यात आले. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आठवड्यातून दोन ते तीनवेळा अचानकपणे हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या. तसेच गावातील सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक यांनाही त्यांच्या गावात हातभट्टी दारू धंदे सुरू असल्यास त्याची माहिती विभागाला देण्याचे आवाह करण्यात आले.

वर्षभरातील कामगिरी...

- हातभट्टी दारू जप्त : 66,822 लिटर

- देशी दारू : 2971 लिटर

- विदेशी दारू : 1043 लिटर

- परराज्यातील दारू : 2970 लिटर

- बियर : 533 लिटर

- ताडी : 12456 लिटर

- गुळमिश्रित रसायन : 12 लाख 7 हजार 749 लिटर

- एकूण जप्त वाहने : 215

आचारसंहितेनंतर 114 गुन्हे आणि 33.61 लाखाचा मुद्देमाल जप्त

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 16 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत एकूण 114 गुन्हे नोंदले असून त्यात 33 लाख एकसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुरुवारी (ता. 4) सकाळच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाने भातंबरे तांडा (ता. बार्शी) या ठिकाणी टाकलेल्या हातभट्टी धाडीत एकूण 19 हजार 200 लिटर रसायन व 500 लिटर हातभट्टी दारू व इतर साहित्य असा एकूण आठ लाख दोन हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एकूण चार गुन्हे नोंदविण्यात आले असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

तसेच कर्नाटकच्या सीमेवर अक्कलकोट तालुक्यात वागदरी व मंगळवेढा तालुक्यात मरवडे या ठिकाणी दोन तात्पुरते सीमा तपासणी स्थापन करण्यात आले आहेत. तेथे संशयित वाहनांची नियमितपणे तपासणी करण्यात येत असून अवैध दारूची वाहतूक होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. याव्यतिरिक्त दारु दुकानातून होणारी दरररोजच्या दारु विक्रीवरही विभागाचे कडक लक्ष असून दारु दुकानांची अचानकपणे तपासणी केली जात असल्याचे अधीक्षक नितिन धार्मिक यांनी सांगितले.

नागरिकांनाही करता येईल सहज तक्रार

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती, वाहतूक, विक्री, साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितिन धार्मिक यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com