esakal | दिव्यांग करणचा क्रिकेटमध्ये नावलौकिक
sakal

बोलून बातमी शोधा

Karan chakote

कामगिरीच्या जोरावर करणने दिव्यांग असतानाही राज्याच्या संघात आपले स्थान मजबूत केले आहे. २०१५ मध्ये राज्य संघात त्याची निवड झाली. आतापर्यंत १६ ठिकाणी चॅम्पियन शोमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली आहे. दिव्यांग खेळाडूही परिस्थितीशी दोन हात करत ‘हम भी किसी से कम नही’ असं म्हणून यश संपादन करीत आहेत. घरची परिस्थिती बिकट असताना करणने यश मिळवले.

दिव्यांग करणचा क्रिकेटमध्ये नावलौकिक

sakal_logo
By
सुस्मिता वडतीले

सोलापूर : येथील करण चाकोते या २५ वर्षांच्या तरुणाने राज्यस्तरीय खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवला आहे. लखनऊ, दिल्ली, पुणे, मुंबई, तमिळनाडू या भागात तो क्रिकेटचे सामने खेळला आहे. 
कामगिरीच्या जोरावर करणने दिव्यांग असतानाही राज्याच्या संघात आपले स्थान मजबूत केले आहे. २०१५ मध्ये राज्य संघात त्याची निवड झाली. आतापर्यंत १६ ठिकाणी चॅम्पियन शोमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली आहे. दिव्यांग खेळाडूही परिस्थितीशी दोन हात करत ‘हम भी किसी से कम नही’ असं म्हणून यश संपादन करीत आहेत. घरची परिस्थिती बिकट असताना करणने यश मिळवले. आई-वडिलांची अखंड साथ व प्रशिक्षकांच्या प्रेरणेमुळे घडलो, असे करणने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 
जिद्द आणि चिकाटीच्या बळावर करणने गरुडभरारी घेतली आहे. करणला साऊथ सोलापूर क्रिकेट क्‍लबचे अशोक टिळक, प्रवीण देशेट्टी आणि नितीन देशमुख, महाराष्ट्र संघाचे कर्णधार गुरुदास राऊत, प्रशिक्षक संजय भोसकर, रवींद्र संते, सारंग चाफले यांच्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी मिळाली. करणला क्रिकेट खेळण्यासाठी लहानपणापासूनच कुटुंबाची साथ मिळाली.
हे आहे करणचे स्वप्न
करणला क्रिकेटसोबत व्यवसाय करायचीही आवड आहे. ‘स्वराज्य इंडस्ट्रीज’ या नावाने व्यवसायास सुरवात केली. त्यातून इलेक्‍ट्रिक मेटल बॉक्‍स बनविले, परंतु आपल्या व्यवसायासोबत त्याने छंद जोपासला. आवर्जून वेळ काढून त्याने राज्याच्या संघात स्थान मिळविले. फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात त्याचा हातखंडा आहे. आता त्याचे आंतरराष्ट्रीय संघात चॅम्पियनशीप खेळण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी तो दररोज भरपूर सराव करत असून आई-वडील, मित्र व प्रशिक्षकांकडून प्रेरणा मिळत आहे.

loading image