Har Ghar Tiranga : 'झेंडा माझा, मी झेंड्याचा... पण साहेब तेवढं घराच बघा'

जमीन, घर-दार नसलं तरी काय झालं, माझ्या झोपडीला मी तिरंगा झेंडा लावलाय, या आपल्या झेंड्याला मी सलाम करतुया... 'झेंडा माझा, मी झेंड्याचा, पण माझ्या राहण्याचं (घराचं) साहेब तेवढे बघा.'
Ravi Pawar
Ravi PawarSakal
Updated on
Summary

जमीन, घर-दार नसलं तरी काय झालं, माझ्या झोपडीला मी तिरंगा झेंडा लावलाय, या आपल्या झेंड्याला मी सलाम करतुया... 'झेंडा माझा, मी झेंड्याचा, पण माझ्या राहण्याचं (घराचं) साहेब तेवढे बघा.'

सांगोला - जमीन, घर-दार नसलं तरी काय झालं, माझ्या झोपडीला मी तिरंगा झेंडा लावलाय, या आपल्या झेंड्याला मी सलाम करतुया... 'झेंडा माझा, मी झेंड्याचा, पण माझ्या राहण्याचं (घराचं) साहेब तेवढे बघा.' आपल्या झोपडीला तिरंगा झेंडा उभारुन देशाभिमान बाळगणाऱ्या घर - दार नसलेला सांगोला शहरहद्दीमध्ये एखतपुर रस्त्याजवळ राहणारा रवी पवार आपल्या जगण्याची व्यथा मांडत होता.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाने 'हर घर तिरंगा' अभियान राबविले आहे. या अभियानानिमित्त प्रत्येक देशवासीयांना आपल्या घरावर तीन दिवस तिरंगा फडकवण्याची परवानगी दिली आहे. अनेक जणांनी आपल्या घरावर, दुकानांवर व शासकीय इमारतींवर आज मोठ्या डौलाने तिरंगा ध्वज फडकवला. सांगोला शहर आणि तालुक्यातील अनेक घरांवर, दुकानांवर व सर्व शासकीय इमारतींवर आज ध्वजारोहण करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण शहर व तालुका जणू तिरंगामय झालेला दिसून आला. 

एखतपूर रस्त्यावर शहरातील मस्के कॉलनीजवळ झोपडीमध्ये राहणाऱ्या रवी पवार यांनीही आपल्या झोपडीला तिरंगा ध्वज फडकावून देशाभिमान बाळगलेला दिसून आला. कुतूलहाने सर्वांचे लक्ष या झोपडीच्या तिरंगा झेंड्याकडे जात होते. याबाबत रवी पवार यांना विचारले असता, 'शहरात सगळ्यांनाच घरावर झेंडे लावण्यासाठी मोफत दिले आहेत. मीही माझ्या या झोपडीवर तिरंगा लावला. मी 14 वर्षे जकात नाक्यावर राहावयास होतो. त्यानंतर आता मला कुठेही घर, जमीन, जागा नसल्याने मी येथे झोपडी करून आई-वडील, पत्नी व मुलांसोबत राहत असल्याचे त्यांनी सांगितले. एक मुलगा व दोन लहान मुले असून याची सर्व जबाबदारी रवी पवार यांच्यावर आहे. लोहार व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाची उपजीविका करीत आहेत. देशाभिमान बाळगण्यासाठी कोणतेही परिस्थितीची गरज नसल्याचे यावरून दिसुन येते.

एखादं घरकुल मिळालं तर बर होईल

माझी तीन लहान मुले, दोन भाचे, आई-वडील, पत्नींचा सांभाळ मला करावा लागत आहे. भाचे मी आश्रम शाळेत शिक्षणासाठी पाठवले आहेत. आई-वडील बसूनच असतात. मी सर्वांना जगवतो परंतु शासनाचं एखादं घरकुल मिळाला तर लय बरं होईल म्हणजे मला आधार मिळंल.

- रवी पवार, लोहार व्यवसायिक, सांगोला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mohol Police
Floating Solar Power Project Planned At Solapur Hipparga Lake To Generate Electricity Worth Rs 1 Crore Every Year
solapur city police
solapur
Marathi News Esakal
www.esakal.com