

harshada-jadhav-deshmukh-pune-graduate-constituency-mva-vss03
esakal
पंढरपूर: "विजय हा निश्चित आहे आणि तो खूप मोठ्या बहुमताने असणार आहे," असा ठाम विश्वास पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार हर्षदा जाधव देशमुख
यांनी व्यक्त केला.
"मी काल उठून आज निवडणुकीची तयारी केलेली नाही. गेले दीड वर्ष मी खूप चांगल्या रीतीने हा संपूर्ण मतदारसंघ बांधते आहे. यामध्ये अनेक विद्यार्थी, अनेक शिक्षकांना मी भेटते आहे. सगळ्यांचीच मानसिकता एक चांगले परिवर्तन घडवायची आहे. असा टोला भाजप उमेदवार डाॅ.स्मिता जाधव यांना हर्षदा यांनी लगावला