
सोलापूर : जगभर बर्ड फ्ल्यूने थैमान घातल्याच्या पार्श्वभूमीवर तुमच्या परिसरात मृत पक्षी दिसला तर त्याच्या पासून दूरच रहा. मृत पक्षी आढळल्यास त्याची माहिती प्रशासनाला कळावा. सोलापूर शहर परिसरात मृत्यू पावलेल्या पक्ष्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी ३८ नमुने भोपाळ येथे तपासणीला पाठविण्यात आले असून, त्याचा अहवाल येण्यास आठ दिवस लागणार असल्याची माहिती, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त विशाल येवले यांनी दिली.