
सोलापूर : निधीअभावी राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून वेतन थकले आहे. सोलापुरातील एक हजार ३५० अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्यातील अनेक जिल्ह्यांतील हजारो अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन न मिळाल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे ते काळ्याफिती लावून कामकाज करीत आहेत.