Heavy rainfall in Dudhani city was lashed by rain | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rain Update

पावसाने दुधनी शहराला चांगलेच झोडपले, अनेक घरांमध्ये शिरले पाणी

अक्कलकोट : दुधनी व रुद्देवाडी ता.अक्कलकोट येथे काल मंगळवारी रात्री साडेदहा ते एक या अडिच तासाच्या काळात प्रचंड पर्जन्यन्यवृष्टी झाल्याने अनेक दुकाने व घरात पाणी घुसले असून त्यांना अनेक गैरसोय व धावपळीचा सामना करावा लागत आहे.काल दिवसभर मोठी उष्णता निर्माण होऊन गर्मी वातावरणात जाणवत होती.रात्री एकूण 42 मिलिमिटर पाऊस झाल्याची अधिकृत नोंद असली तरी खूप मोठा पाऊस झाल्याचा दावा गावकरी करित आहेत.

या पावसाने दुधनी शहरातील नगपरिषद जवळील व्यापारी गाळे, त्यापुढील सखल भागातील सर्वच दुकाने,हॉटेल व इतर व्यवसायिक तसेंच उतारच्या भागातील अनेक घरात पाणी शिरून खूप मोठे नुकसान झाल्याचे दुधनी येथील व्यापारी व ग्रामस्थ आपली प्रतिक्रिया देत आहेत. दुधनी शहर व परिसराला मंगवारी रात्री साडे दहाच्या सुमारास मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. यामुळे मैंदर्गी नाक्यावरील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने येथील हॉटेल आणि पान टपर्यांमध्ये पाणी शिरले होते.

त्याच बरोबर मुसळधार पावसामुळे नागोबा नगर येथील अनेक घरामध्ये गूडघ्याभर पाणी शिरले होते. यामुळे या भागातील नागरिकांना रात्र जागून काढावे लागले. जोरदार पडलेल्या पावसामुळे ओढे,नाले तुडूंब भरून वाहत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास देखील पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यानंतर रात्री साडे दहाच्या सुमारास मेघ गर्जनेसह अचानक पावसाला सुरुवात झाली.रात्री साडे दहाच्या सुमारास सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत सुरूच होता.

मुगळी,सिन्नुर,आंदेवाडी(जा),रुद्देवाडी,चिंचोळी (मैं),बबलाद बिंजगेर,संगोगी (ब) या भागात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली.पावसाचा जोर पाहून नागरिकांमध्ये भीतीही निर्माण झाली आहे.या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून राहिले असून उगवण झालेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तर काढणीस आलेल्या मूग, उडीद पिकाबरोबरच सूर्यफूल,भुईमूग,तूर,कांदा,सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Web Title: Heavy Rainfall In Dudhani City Was Lashed By Rains

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..