मंगळवेढा तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंगळवेढा तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; पिकांचे नुकसान

मंगळवेढा तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; पिकांचे नुकसान

मंगळवेढा : उत्तरा नक्षत्राच्या दमदार पावसामुळे मंगळवेढा शहर व तालुक्याच्या पूर्व भागात झालेल्या दमदार पावसामुळे पिकाच्या नुकसानी बरोबर पुर्व भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. सर्वात जास्त पाऊस बोराळे तर सर्वात कमी पाऊस हुलजंती महसूल मंडळांमध्ये नोंदवण्यात आला.

हेही वाचा: साखर आयुक्तालयाकडून FRP वेळेत न देणारे कारखाने लाल यादीत

गेल्या काही दिवसापासून अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे खरीप पिकाचे नुकसान झाले होते अशात गणेशोत्सवात दमदार पावसाच्या अपेक्षित असलेल्या शेतकऱ्यांना त्या कालावधीत पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे खरीप हंगामात अल्पशा पावसावर होऊन आलेली पिके सुकून गेली. मात्र उत्तरा नक्षत्रातील दमदार पावसाची हजेरी आंधळगाव, बोराळे, मंगळवेढा या तीन महसूल मंडळात लावली. शहर,पश्चिम व पूर्व भागातील सूर्यफूल, बाजरी, तुर, कांदा, मका या प्रमुख पिकासह फळ पिकाचे नुकसान झाले आहे.

एस वाय मंगळवेढा बोराळे, बोराळे ते रहाटेवाडी , तांडोर-तामदर्डी ते रहाटेवाडी या गावाला दळणवळण असणाऱ्या पुलावर पाणी आल्यामुळे या गावाची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे या भागातील या मार्गावर पुलांची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात असताना प्रशासन पातळीवरून पुलाच्या कामासाठी विलंब होत असल्यामुळे याचा त्रास या भागातील नागरिकांना सोसावा लागत आहे अशा परिस्थितीत एखाद्या आजारी माणसाला उपचारासाठी दवाखान्यासाठी नेताना विलंब झाल्यास यात नाहक रुग्णांचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याची जबाबदारी कोण स्वीकारणार ? असा सवाल या भागातील नागरिकांतून विचारला जात आहे.पावसामुळे शहरात विद्युत पुरवठा खंडित झाला. नगरपालिकेच्या अनेक व्यापारी गाळ्यामध्ये पाणी आल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या मालाचे नुकसान झाले आहे तालुक्यातील सात महसूल मंडळांमध्ये काल रात्री नोंदविला पाऊस मि.मि.मध्ये पुढीलप्रमाणे ,मंगळवेढा 45,मरवडे 13,आंधळगाव 53,मारापूर 40,भोसे 9,बोराळे 59,हुलजंती 7,सरासरी 32.28 मि.मी. पावसाची नोंद नोंदवण्यात आले तर नव्याने झालेल्या पाठखळ महसूल मंडळांमध्ये पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले नाही.

"अतिवृष्टीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांनी कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा क्रॉप इन्सुरेन्स ॲप द्वारे नुकसान झाल्यापासून ७२ तासाच्या आत कंपनीला तक्रार दिली तरच पिक विम्याची नुकसान भरपाई मिळणे शक्‍य होणार आहे."-गणेश श्रीखंडे तालुका कृषी अधिकारी

loading image
go to top