Mohol Ganeshotsav : मोहोळ शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी, गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या किमती वाढल्या

गणेश आगमनाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ शहरातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला गणेश मूर्ती खरेदी साठीच्या उभारण्यात आलेल्या स्टॉलवर प्रचंड गर्दी दिसून आली.
Mohol Ganeshotsav

Mohol Ganeshotsav

sakal

Updated on

मोहोळ - गणेश आगमनाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ शहरातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला गणेश मूर्ती खरेदी साठीच्या उभारण्यात आलेल्या स्टॉलवर प्रचंड गर्दी दिसून आली. दुपारी दोन वाजल्या नंतर मोठ्या प्रमाणात गर्दी सुरू झाली.कडक उन्हात ही नागरिकांचा उत्साह दिसून आला. अत्यंत आकर्षक अशा गणेशमूर्ती हे या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. मोहोळचा मोरया गणेश मंडळाचा गरुडावर बसलेला गणेश हे सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com