उजनी धरणामुळे माढा तालुक्यात सर्वाधिक जलसंपदा

जिल्ह्यात साडेतीन हजार दशलक्ष घनमीटर साठवणुकीची क्षमता
उजनी धरण
उजनी धरणsakal

सोलापूर - एकेकाळी दुष्काळी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात तीन हजार ५५० दशलक्ष घनमीटर पाणी साठवणूक क्षमता असून, उजनी धरणामुळे हे शक्य झाले आहे. तालुकानिहाय विचार केल्यास माढा तालुका सर्वाधिक जलसंपत्ती धारण करणारा ठरतो. कधी काळी सोलापूर म्हणजे दुष्काळी जिल्हा अशीच ओळख राज्यभर होती. मात्र, उजनी व इतर धरणांमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंपत्ती साठवली असून मागील अनेक वर्षे सोलापूर हा राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असलेला व सर्वाधिक उसाच गाळप करणारा जिल्हा ठरला आहे. एकट्या उजनी धरणात तीन हजार ३२० दशलक्ष घनमीटर पाणी साठवणुकीची क्षमता आहे. त्या खालोखाल एकरुख (हिप्परगा), हिंगणी, जवळगाव, मांगी, आष्टी, बोरी, पिंपळगाव (ढाळे) येथील मध्यम प्रकल्पांमधून २३०.९४ दशलक्ष घनमीटर पाणी साठवले जाते.

उपयुक्त जलसाठ्याचा विचार केल्यास सर्वांत वरचा क्रमांक एकरुख (हिप्परगा) व आष्टी तलावाचा लागतो. विशेष म्हणजे, हे दोन्ही तलाव ब्रिटिशकालीन असून या दोन्ही तलावांची एकूण साठवणूक क्षमता व उपयुक्त जलसाठा यांचे प्रमाण समान म्हणजे अनुक्रमे ६१.१६ व २३.०१ इतके आहे. इतर धरणांमध्ये मात्र एकूण साठवणूक क्षमता व उपयुक्त जलसाठा यात तफावत आहे. सर्वाधिक मोठा फरक उजनी धरणात आहे.

उजनीला प्रदूषणाचे ग्रहण

सोलापूर जिल्ह्याला लाभलेले वरदान म्हणून उजनी धरणाची ओळख आहे. भीमा नदीवरील या धरणात येणारे सर्व पाणी पुणे जिल्ह्यातून येते. भीमा, इंद्रायणी, भामा, आंध्रा या नद्यांकाठी वसलेली पुणे शहराची उपनगरे व औद्योगिक वसाहती यामुळे या नद्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये दूषित जलसाठा मोठ्या प्रमाणात आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास भविष्यात सोलापूरच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्यावर गंभीर परिणाम होणार आहे. दुसरीकडे, एकरुख (हिप्परगा) व आष्टी (ता. मोहोळ) हे दोन्ही तलाव ब्रिटिशकालीन असून, प्रदूषणविरहीत आहेत.

प्रकल्पाचे नाव प्रकल्पीय पाणीसाठा

एकूण दलघमी उपयुक्त दलघमी

मोठे प्रकल्प

भीमा (उजनी) ३३२०.०१ १५१७.२०

मध्यम प्रकल्प

एकरुख ६१.१६ ६१.१६

हिंगणी ४५.५१ ३१.९७

जवळगाव ३४.९२ २९.१९

मांगी ३०.३९ ३०.२०

आष्टी २३.०१ २३.०१

बोरी २३.२९ १९.२५

पिंपळगाव (ढाळे) १२.६६ ९.८६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com