सलग दुसऱ्या वर्षी हिंगणी मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो; शेतकरी समाधानी
sakal

सलग दुसऱ्या वर्षी हिंगणी मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो; शेतकरी समाधानी

उस्मानाबाद जिल्ह्यातील बालाघाटच्या डोंगररांगात व हिंगणी धरण क्षेत्र परिसरात चित्रा नक्षत्रात पावसाने दमदार बॅटिंग केल्याने राम नदीला व भोगावती नदीला महापूर येऊन हिंगणी प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षीही ओव्हरफ्लो झाल्याने बळीराजा सुखावला आहे

मळेगाव : उस्मानाबाद जिल्ह्यातील बालाघाटच्या डोंगररांगात व हिंगणी धरण क्षेत्र परिसरात चित्रा नक्षत्रात पावसाने दमदार बॅटिंग केल्याने राम नदीला व भोगावती नदीला महापूर येऊन हिंगणी प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षीही ओव्हरफ्लो झाल्याने बळीराजा सुखावला आहे. 1972 सालच्या दुष्काळात बांधलेल हिंगणी प्रकल्प बार्शी तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखले जाते.

सलग दुसऱ्या वर्षी हिंगणी मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो; शेतकरी समाधानी
मोहोळ: लोकअदालतमध्ये अडीच कोटीची विक्रमी तडजोड

हिंगणी मध्यम प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता 1600 द.ल.घ.फु.इतकी असून मृतसाठा पाणीपातळी 478 द.ल.घ.फु.आहे. सध्या धरण 100 टक्के भरले असून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ढाळे पिंपळगाव प्रकल्पही ओव्हरफ्लो झाला असून निलकंठा नदीला महापूर आला आहे. निलकंठा नदीला आलेल्या महापुरामुळे साकत-पिंपरी गावचा संपर्क तुटला आहे. गेल्या वर्षी 13 व 14 ऑक्टोबरला झालेल्या अतिवृष्टीत हिंगणी धरण ओव्हरफ्लो झाले होते. मात्र यावर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे 24 सप्टेंबरपर्यंत धरण 82 टक्के भरले होते.

25 सप्टेंबरला मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीत हिंगणी प्रकल्प शंभर टक्के भरला असून भोगावती नदीला महापूर आला आहे.हिंगणी येथील भोगावती नदीवरील जुना दगडी पूल पाण्याखाली गेल्याने वैराग-मळेगाव वाहतूक ठप्प झाली आहे.तसेच पिंपरी-वैराग,जामगाव-भातंबरे येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढे, नाले, नद्या, बंधारे, तलाव, एल बेस भरून वाहत आहेत. धरण भरल्याने एकीकडे शेतकरी समाधानी झाला असला तरी शेतातील काढणीला आलेलं सोयाबीन, उडीद, कांदा व इतर पालेभाज्या व फळबागांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकाऱ्यांची अवस्था 'कही खुशी कही गम' अशी झाली आहे.

शेतकऱ्यांचा वरदायिनी म्हणून ओळख असलेला हिंगणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने हिंगणी, पिंपरी, साकत, मळेगाव, लाडोळे, घाणेगाव, उपळे, जामगाव, नांदनी, लाडोळे, हळदुगे, मानेगाव, काळेगाव, तडवळे, इर्ले, इर्लेवाडी येथील शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. परिणामी धरणक्षेत्र व कॅनॉलक्षेत्र परिसरात द्राक्ष, ऊस, सीताफळ, बोर, पेरू व इतर फळबागांचे क्षेत्र वाढले आहे. घाणेगाव येथे भोगावती व निलकंठा नदीचा संगम होतो. पुढे भोगावती नदीने रौद्र रुप धारण केले आहे. त्यामुळे भोगावती नदीकाठच्या गावांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

बार्शी तालुका मंडळ निहाय दिनांक 26.9.2021 रोजीचा पाऊस मी.मी.

बार्शी- 7.0,अगळगाव- 22

वैराग- 30,पानगाव- 22,सुर्डी- 14,गौडगाव- 85

पांगरी- 71,नारी- 56,उपळे (दु).- 50,खांडवी- 18

एकुण पाऊस - 375 मी. मी.

सरासरी पाऊस -37.5 मी.मी.

हिंगणी प्रकल्पामुळे धरणक्षेत्र परिसरात द्राक्ष बागेचे,ऊसाचे व इतर बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे.सलग दुसऱ्या वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने वर्षभराचा पाणी प्रश्न मिटल्याने शेतकरी समाधानी झाला आहे.- बाळासाहेब माळवदे-द्राक्ष उत्पादक शेतकरी, हिंगणी

25 सप्टेंबरला मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीत बार्शी तालुक्यातील सर्वात मोठा हिंगणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने भोगावती नदीला महापूर आला आहे. उस्मानाबाद, उपळे, चिलवडी, सावरगाव, पिंपरी (आर) परिसरात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणे सुरू आहे तरी भोगावती नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे.- रवींद्र कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभाग, बार्शी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com