
सोलापूर : सोलापुरातील मटका आणि डान्सबारच्या तक्रारी आपणास प्राप्त झाल्या आहेत. शहरातील मटका व डान्सबारमुळे निर्माण होणाऱ्या गुन्ह्यांना व परिणामांवर पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी दोन दिवसांत कारवाई करावी, असे आदेश गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बुधवारी पोलिसांना दिले.