Short Circuit महूदमध्ये किराणा दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग; तब्बल ३५ लाखांचे नुकसान
Solapur News : आगीचे स्वरूप लक्षात येताच तत्काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला. जमलेल्या नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी पाईपने पाणी मारण्यास सुरवात केली. काही वेळाने नगरपालिकेची अग्निशमन गाडी येथे दाखल झाली.
A massive fire broke out in a grocery store in Mahood due to a short circuitSakal
महूद : येथील किराणामाल व हार्डवेअर दुकानाच्या गोदामाला शॉर्टसर्किटमुळे आज (गुरुवारी) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीत दुकानातील तसेच संसारोपयोगी साहित्य असे एकूण तीस ते पस्तीस लाख रुपयांचे साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले.