हॉटेल व्यवसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून, लोखंडी पाईपने मारहाण करुन लूट

हॉटेल व्यवसायिकाची चारचाकी गाडी रस्त्यात अडवून स्कॉर्पिओ व स्विफ्ट कारमधून आलेल्या चार अज्ञातांनी बंदुकीचा धाक दाखवून, लोखंडी पाईपने मारहाण करुन अडीच लाख रुपये लंपास केले.
crime
crimesakal
Summary

हॉटेल व्यवसायिकाची चारचाकी गाडी रस्त्यात अडवून स्कॉर्पिओ व स्विफ्ट कारमधून आलेल्या चार अज्ञातांनी बंदुकीचा धाक दाखवून, लोखंडी पाईपने मारहाण करुन अडीच लाख रुपये लंपास केले.

मोहोळ - हॉटेल व्यवसायिकाची चारचाकी गाडी रस्त्यात अडवून स्कॉर्पिओ व स्विफ्ट कारमधून आलेल्या चार अज्ञातांनी बंदुकीचा धाक दाखवून, लोखंडी पाईपने मारहाण करुन अडीच लाख रुपये लंपास केले. हि घटना 31 मे रोजी पहाटे तीन वाजता शेटफळ ता. मोहोळ येथील विश्रामगृहात समोर घडली. सुरेश उर्फ बबलु प्रकाश गुंड (रा. खंडाळी, ता. मोहोळ) असे लूट झालेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, खंडाळी येथील सुरेश उर्फ बबलु प्रकाश गुंड हे हॉटेल व्यवसाय करतात. 30 मे रोजी ते त्यांचा मित्र चित्तारा उर्फ लाला बाळू मुळे याच्यासह अशोक लेलंड बडा दोस्त (एम.एच. 45 ए.ई. 5348) या गाडीने निखिल मार्केटिंग पुणे यांच्याकडे नाना निवृत्ती चव्हाण यांचे किराणा मालाचे पैसे आणण्याकरता गेले होते. रात्री पावणे अकरा वाजता हे दोघेजण पैसे घेऊन पुण्याहून खंडाळीकडे निघाले होते. मध्यरात्री अडीच वाजता सुरेश गुंड यांनी चित्तारा उर्फ लाला मुळे यांना मोडनिंबमध्ये सोडून खंडाळीकडे निघाले होते.

पहाटे तीन वाजता त्यांची चार चाकी शेटफळ येथील विश्रामगृहात समोर आली असता, पाठीमागून पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ व ग्रे रंगाची स्विफ्ट कार त्यांच्या कार समोर येऊन उभी राहिली. त्या दोन्ही गाड्यातून लाल रंगाचा शर्ट व निळी रंगाची जिन्स, निळया रंगाचा फुल भायाचा ट्रॅक सुट, काळ्या रंगाची पॅन्ट शर्ट आणि टीशर्ट व जिन्स पॅन्ट घातलेले चार अज्ञात लोक खाली उतरले. त्यातील एकाने सुरेश गुंड यांच्या गाडीच्या काचेवर अंडी फेकून मारले. यावेळी एक जणांनी त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडून त्यांना खाली उतरवून लोखंडी पाईपने मारहाण केली. यावेळी लाल रंगाचा शर्ट घातलेल्या इसमाने गुंड यांच्या डोक्याला बंदूक लावून 'आवाज करू नको, नाहीतर तूला गोळ्या घालीन' अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांनी सुरेश गुंड यांच्या गाडीत पांढऱ्या रंगाच्या पिशवीत ठेवलेले अडीच लाख रुपये काढून घेतले. व गुंड यांची गाडी लॉक करून चावी घेऊन पसार झाले. सर्व लुटारूंनी पायामध्ये बुट व तोंडावरती मास्क लावलेले होते. तसेच त्यांच्या दोन्ही गाडयावरती नंबर प्लेट नव्हती.

या प्रकरणी सुरेश गुंड यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार चार अज्ञात लुटारूंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहोळचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनाजी खापरे हे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com