महिलेच्या दुःखद प्रसंगात तामिळनाडूत मदतीला आले महाराष्ट्राचे तीन अधिकारी..

रोहिणी भाजीभाकरेंनी बजावली मोलाची भूमिका
husband death at home Three Maharashtrian officials help to woman in Tamil Nadu Rohini Bhajibhakare solapur
husband death at home Three Maharashtrian officials help to woman in Tamil Nadu Rohini Bhajibhakare solapur sakal

उपळाई बुद्रूक, (जिल्हा सोलापूर) : तामिळनाडू राज्यात एका ट्रॅव्हल्सने आयोजित केलेल्या दर्शन यात्रेसाठी गेलेल्या महिलेच्या पतीचे अचानकपणे घरी निधन झाले. एवढ्या दुरवरून महिलेला अंतिमविधी नाही परंतु किमान सावडण्याच्या विधीला तरी, आणण्यासाठी नातेवाईकांचे प्रयत्न सुरू होते. अशा कठिण व दुःखाच्या प्रसंगी या महिलेच्या व कुटुंबीयांच्या मदतीला महाराष्ट्रातील तीन उच्च दर्जाचे अधिकारी धावून आले असुन, त्यात उपळाई बुद्रूकच्या कन्या तथा आयएएस रोहिणी भाजीभाकरे यांनी मोलाची भूमिका बजावत. त्या महिलांना तातडीने गाडी उपलब्ध करून देत गावी पोहच केले आहे. माढा तालुक्यातील वरवडे येथील हि घटना आहे.

घटनेची हकिकत अशी की, वरवडे येथील काही महिला एका ट्रॅव्हल्सने आयोजित केलेल्या दर्शन यात्रेसाठी तामिळनाडू येथे गेल्या होत्या. त्यातील एका महिलेच्या पतीचे ता.26 एप्रिल रोजी घरी अचानक निधन झाले. त्यामुळे या ट्रॅव्हल्समधील 6 महिलांना तात्काळ घरी यायचे होते. परंतु त्या महिला तामिळनाडू राज्यात चेन्नई पासून 150 किमी अंतरावर तर पॉंडीचेरी पासून 50 किमी अंतरावर तर त्या सोलापूरपासून जवळपास 1000 किमी अंतरावर होत्या. सदर महिला या कमी शिक्षित व कधीही स्वतः प्रवास केलेल्या नसल्याने, त्यांना हिंदी देखील बोलता येत नव्हते त्यामुळे तामिळ आणि इंग्रजी तर दूर चा विषय होता. ता 28 रोजी मयत व्यक्तीचा सावडण्याचा विधी असल्याने, अंत्यसंस्कारासाठी नाही किमान तिसऱ्या दिवशी तर महिलांना आणणे अत्यंत गरजेचे होते. त्यामुळे नातेवाईकांना इकडे-तिकडे फोन करण्यास सुरुवात केली. यावेळी गावातीलच ओंकार शिंदे यांनी मदतीसाठी पुणे येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे यांना सांगितले.

अशा भावनिक दुःखद प्रसंगामुळे त्यांनी तातडीने मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. परंतु आशेचा किरण दिसत नव्हता. शेवटी त्यांनी या घटनेची माहिती रोहिणी भाजीभाकरे यांना मोबाईलवर मेसेजद्वारे सांगितली व मदतीची विनंती केली. त्यांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने प्रतिसाद देत. महिलांचे मोबाईल नंबर, लोकशेनची माहिती घेतली. व तामिळनाडू राज्यात महाराष्ट्रीयन असलेले अतिरिक्त पोलीस महासंचालक विनीत वानखेडे व सदर महिला असलेल्या ठिकाणी च्या वेल्लापूरम जिल्ह्यातील अतिरिक्त पोलिस अधीक्षक करूण गरड यांना या घटनेची माहिती दिली. त्यामुळे अवघ्या दहा मिनिटात तातडीने वरील अधिकाऱ्यांनी स्वतःहून सहाय्यक पोलीस निरीक्षक ननवरे यांच्याशी संपर्क साधात. सदर महिलांना तातडीने मदत करण्याचे आश्वासन दिले. व अवघ्या अर्ध्या तासात महिलांना एक इंनोवा गाडी उपलब्ध करून देत लांबचा प्रवास असल्याने 2 ड्रायव्हरही सोबत देऊन 24 तासांच्या आतमध्ये महिलांना सुखरूप घरी पोहचवले.

सामान्य नागरिकांच्या भावनिक व कठिण दुःखद प्रसंगात रोहिणी भाजीभाकरे व महाराष्ट्रीयन असलेल्या अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्या महिलांना वेळेत घरी पोहचता आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडुन या अधिकाऱ्यांच्या मदतीचे कौतुक होत आहे.

यांनी देखील केले प्रयत्न.

- पुणे शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभिम नाईकनवरे, सोलापूर तहसीलदार अमरदीप वाकडे, ओंकार शिंदे यांनी तातडीने एकमेकांना फोनद्वारे माहिती दिल्याने मदत मिळाली लवकर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com