esakal | हुतात्मा एक्‍सप्रेस 31 मेपर्यंत रद्द 

बोलून बातमी शोधा

railway.jpg

या कामाच्या देखभाल, दुरुस्तीसाठी आणि दुहेरीकरणाच्या कार्यासाठी घेण्यात येणाऱ्या इजिनियरिंग ब्लॉकमुळे खालील विशेष मेल एक्‍सप्रेस गाड्या ता.7 एप्रिल पर्यत रद्द करण्यात आल्या होत्या. आता या गाड्याचा रद्द करण्याचा अवधी ता. 31मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. 

हुतात्मा एक्‍सप्रेस 31 मेपर्यंत रद्द 
sakal_logo
By
विजय थोरात

सोलापूर : सोलापूर विभागातील भाळवणी-भिगवण सिंगल लाइन सेक्‍शनमध्ये (8 ब्लॉक सेक्‍शन मध्ये) दुहेरीकारणच्या चालू आहे. या कामाच्या देखभाल, दुरुस्तीसाठी आणि दुहेरीकरणाच्या कार्यासाठी घेण्यात येणाऱ्या इजिनियरिंग ब्लॉकमुळे खालील विशेष मेल एक्‍सप्रेस गाड्या ता.7 एप्रिल पर्यत रद्द करण्यात आल्या होत्या. आता या गाड्याचा रद्द करण्याचा अवधी ता. 31मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. 

रद्द केलेल्या विशेष एक्‍सप्रेस गाड्या पुढील प्रमाणे : 
गाडी क्रमांक 01157 पुणे-सोलापूर विशेष एक्‍सप्रेस (आठवड्यात पाच दिवस) ही यात्रा प्रारंभ ता. 8 एप्रिल ते 31मे दरम्यान रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 01158 सोलापूर-पुणे विशेष एक्‍सप्रेस(आठवड्यात पाच दिवस) ही यात्रा प्रारंभ ता. 8 एप्रिल ते 31 मे दरम्यान रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 07613 पनवेल-नांदेड विशेष एक्‍सप्रेस (दररोज) ही यात्रा प्रारंभ ता.9 एप्रिल ते 1 जून दरम्यान रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 07614 नांदेड-पनवेल विशेष एक्‍सप्रेस (दररोज) ही यात्रा प्रारंभ ता. 8 एप्रिल ते 31मे दरम्यान रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 08519 विशखापट्टनम-लोकमान्य टिळक टर्मिनल विशेष एक्‍सप्रेस (दररोज) ही यात्रा प्रारंभ ता. 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 08520 लोकमान्य टिळक टर्मिनल- विशखापट्टनम विशेष एक्‍सप्रेस (दररोज) ही यात्रा प्रारंभ ता. 11 एप्रिल ते 1 जून दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तरी सर्व संबंधित रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी व आपल्या प्रवास सुनिश्‍चित करावा असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

संपादन : अरविंद मोटे