

पंढरपूर : मी आणि मराठा समाज विधानसभा निवडणुकीच्या मैदानात असतो आणि समीकरण जुळले असते तर सगळ्यांचा सुपडासाफ केला असता, असा अप्रत्यक्ष टोला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. मराठा समाज कोणाच्या दावणीला बांधणार नाही. समाज स्वतःचा मालक आहे. मी समाजावर मनमानी केली नाही आणि करणार ही नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.