लस टोचल्यावर ताप आला, तर समजा लसीचे शरीरातील काम सुरू झाले !

लस टोचल्यावर ताप आला, तर समजा लसीचे शरीरातील काम सुरू झाले !
कोविशिल्ड लस
कोविशिल्ड लसMedia Gallery
Updated on
Summary

कोविशिल्ड असो कोवॅक्‍सिन लस टोचल्यानंतर त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी कणकण येते.

सोलापूर : देशातील सर्वाधिक कोरोना (Covid-19) रुग्ण वाढणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत सोलापूर (Solapur) असून, पहिल्या लाटेतही सोलापूर जिल्ह्याचा मृत्यूदर सर्वाधिक होता. दोन्ही अनुभव पाठीशी असतानाही तिसऱ्या लाटेपूर्वी सर्वांचे लसीकरण (Vaccination) होणे आवश्‍यक आहे. तरीही, पालकमंत्र्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींचे तोंडावर बोट असून उद्दिष्टाच्या केवळ 23 टक्‍केच व्यक्‍तींना सहा महिन्यांत लस (Vaccine) मिळाली आहे.

कोविशिल्ड लस
मुस्लिम धर्मात अधिकृत तर हिंदू धर्मातील लोकांना अनधिकृत बायका : रामदास आठवले

शहर-ग्रामीणमधील 35 लाख 78 हजार 32 व्यक्‍तींचे लसीकरण करण्याचे टार्गेट असतानाही सहा महिन्यांत अवघ्या आठ लाख 43 हजार 648 व्यक्‍तींनाच लस मिळाली आहे. त्यापैकी अनेकांना दुसऱ्या डोससाठी हेलपाटे मारावे लागत असल्याचेही चित्र आहे. तिसऱ्या लाटेपूर्वी तरुणांसह गरोदर माता आणि 18 वर्षांवरील को-मॉर्बिड व्यक्‍तींच्या लसीकरणाला प्राधान्य दिले जाणार आहे. सध्याच्या गतीने लसीकरण सुरू राहिल्यास लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी किमान तीन महिन्यांचा (नोव्हेंबरअखेर) कालावधी लागणार आहे. फेब्रुवारीत लसीकरणाला सुरवात झाल्यापासून जिल्ह्यातील केवळ 23 टक्केच व्यक्‍तींना लस टोचण्यात आली आहे. महापालिका, जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पत्रव्यवहार करीत अधिकाधिक लस देण्याची मागणी केली. तरीही, आठवड्यातून एकदा 25 ते 30 हजार डोसशिवाय ज्यादा लस मिळालीच नाही. सध्या शहराला एकूण लसीतून 40 टक्‍के तर ग्रामीणसाठी 60 टक्‍के लस वापरली जात आहे. चिंतेची बाब म्हणजे, दोन्ही लाटेत आतापर्यंत शहर-ग्रामीणमधील साडेचार हजारांहून अधिक व्यक्‍तींचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाच्या सर्व्हेत जिल्ह्यातील 70 हून अधिक मुले कोरोनाबाधित आढळली. दररोज वाढणाऱ्या रुग्णांमध्येही तरुणांसह चिमुकल्यांचा समावेश आहे. या पार्श्‍वभूमीवर पुढील आठवड्यापासून ग्रामपंचायतींतून टोकन देऊन 18 वर्षांवरील तरुणांना लस टोचली जाणार आहे. गावस्तरावर ऑन दि स्पॉट तर शहरात ऑनलाइन पद्धतीनेच लसीकरण होईल, असे लसीकरणाचे जिल्हा समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी सांगितले.

कोविशिल्ड लस
अफगाणिस्तानवरील तालिबानी वर्चस्वामुळे केळी निर्यातीवर परिणाम

लस टोचल्यावर ताप आला तर...

कोविशिल्ड असो कोवॅक्‍सिन लस टोचल्यानंतर त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी कणकण येते, अंगात ताप भरतो. त्यावेळी घाबरून न जाता वैद्यकीय सल्ल्यानुसार औषध घेता येईल. मात्र, लसीकरणानंतर अंगात ताप आला म्हणजे लसीचे शरीरातील काम सुरू झाले, असा त्याचा अर्थ होतो, अशी माहिती डॉ. पिंपळे यांनी दिली. दुसरीकडे, पहिला डोस घेतल्यानंतर अथवा एकही डोस न घेता कोरोनाची बाधा झालेल्यांनी तीन महिन्यानंतर लस टोचून घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका तरुणांना व लहान मुलांना असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या पार्श्‍वभूमीवर आता 18 वर्षांवरील तरुणांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले जाणार आहे. शहर-ग्रामीणमध्ये दुसरा डोस आणि तरुणांचे प्राधान्याने लसीकरण करण्याचा कृती आराखडा तयार केला आहे.

- डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा समन्वयक, लसीकरण, सोलापूर

जिल्ह्यातील लसीकरणाचे टार्गेट

  • 45 ते 59 वयोगट : 9,66,997

  • 60 वर्षांवरील व्यक्‍ती : 4,75,564

  • 18 ते 44 वयोगट : 21,35,471

  • एकूण : 35,78,032

लस टोचलेली सद्य:स्थिती

  • 45 ते 59 वयोगट : 2,61,595

  • 60 वर्षांवरील व्यक्‍ती : 2,26,498

  • 18 ते 44 वयोगट : 2,35,102

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Drugs
sangola, shelakewadi zp school
A demand has been made to provide five new MSRTC buses to the Mangalwedha ST Depot to improve passenger services.
How will B-2 land regularization benefit Solapur?
Marathi News Esakal
www.esakal.com