esakal | कोरोना : घाबरु नका; कलम १४४ मधून हे वगळले आहे
sakal

बोलून बातमी शोधा

Implement of mobilization order started

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. पुणे आणि मुंबईमध्ये कामधंदा, शिक्षण, नोकरीसाठी गेलेल्यांची संख्या जास्त आहे. आणि आता कोरोनाच्या भितीने हा लोंढा आता गावाकडे निघाला आहे. मात्र, यामुळे कोरोना पसरण्याची शक्यता आहे.

कोरोना : घाबरु नका; कलम १४४ मधून हे वगळले आहे

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

सोलापूर : रिक्षा बस थांबे, एसटी स्टॅड, रेल्वे स्टेशनसह भाजीपाला, किराणा दुकान यांना १४४ कलम मधून वगळण्यात आले आहे. कोरोनाचा प्रदार्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जमावबंदीचा (कलम १४४) आदेश लागु केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे.

याच्याबाबत अनेक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, मात्र याने घाबरायचे कारण नाही. कारण यातून सरकारने अत्यावश्‍यक सेवा सुरु राहणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी आदेश काढून प्रसिद्ध केला आहे. १४४ च्या आदेशातून काय वगळले आहे, याची माहिती देण्यात आली आहे. 
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. पुणे आणि मुंबईमध्ये कामधंदा, शिक्षण, नोकरीसाठी गेलेल्यांची संख्या जास्त आहे. आणि आता कोरोनाच्या भितीने हा लोंढा आता गावाकडे निघाला आहे. मात्र, यामुळे कोरोना पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार विविध उपाय योजना करत आहे. त्याचाच भाग म्हणून रेल्वे, एसटी व खासगी बसची वाहतुकसेवाही बंद केली आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात काय बद असणार आणि काय सुरु असणार याबाबत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आदेश काढला आहे.

यांना आदेश लागु नाही

  1. रेल्वे स्टेशन, एस. टी. स्टँड, महापालिका परिवहन थांबे व रिक्षा थांबे
  2. बँका
  3. अंत्यविधी (या ठिकाणी गर्दी होऊ नये याची दक्षता घ्यावी.)
  4. अत्यावश्‍यक किराणा सामान, दुध, दुग्धउत्पादने, फळे व भाजीपाला, जीवनावश्‍यक वस्तू विक्रीची ठिकाणे
  5. सर्व हॉटेल, लॉज यांना तेथे राहणाऱ्या ग्राहकांना आरोग्यविषयक काळजी घेऊन रेस्टॉरंटमध्ये पदार्थ बनवून देणे
  6. विद्यार्थ्यांची खाणावण, मेस, महाविद्याल व वस्तीगृहातील कॅन्टीन
  7. १० वी व १२ विद्यार्थी, स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे, विद्यापीठाची परिक्षा देणारे परिक्षार्थी
  8. प्रसारमाध्यम
  9. याशिवाय इतर काही व्यक्ती. मात्र त्यांनी जवळ ओळखपत्र बाळगणे आवश्‍यक आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास पोलिसांकडून कारावाई केली जाणार आहे.