ऑनलाइन शिक्षणासोबत व्यक्तिमत्त्व विकासाला महत्वः शिक्षिका मनिषा पांढरे यांचा विद्यार्थ्यांसाठी उपक्रम 

manisha pandhre new.jpg
manisha pandhre new.jpg

सोलापूर : माळशिरस तालुक्‍याने कोव्हिड काळात विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी लर्न फ्रॉम होम ही अभ्यासमाला सुरू केली. यात माळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका मनिषा पांढरे यांच्याकडे दुसरीचे गटप्रमुखाचे नेतृत्त्व त्याचबरोबर पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी लिंक बनवण्याची संधी मिळाली. सुरवातीला या लिंकला प्रतिसाद फारच अल्पप्रमाणात असायचा. पण नंतर नंतर मात्र प्रतिसाद वाढत गेला. लिंकमध्ये दररोजच्या अभ्यासक्रमावर आधारित एक व्हिडिओ व त्यावर आधारित प्रश्नोत्तरांचा समावेश करण्यात आलेला असल्याने विद्यार्थ्यांना घटक व त्यावरील प्रश्न सोडविण्याची संधी मिळत असे. वर्ग, तालुका, जिल्हा आणि नंतर राज्यभर या लिंकला मागणी येऊ लागली. दररोज पाचशे ते सातशे विद्यार्थी ही अभ्यासमाला सोडवत असत. पालक व शिक्षकांच्या राज्यभरातून प्रतिक्रिया येत असल्याने ते बनवण्यासाठी सतत प्रोत्साहन मिळत राहिले. 

काही पालकांच्या समस्या, रेंज प्राब्लेम लक्षात घेता ऑनलाईन अभ्यासाबरोबरच ऑफलाइन पीडीएफ देण्यास सुरुवात केली. यात आठवड्याचा अभ्यास समाविष्ट करण्यात आलेला असे. यामुळे या आफलाइन उपक्रमासही प्रतिसाद मिळाला. मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, यासाठी दर रविवारी मनोरंजनात्मक अभ्यास विद्यार्थ्यांना दिला जात असे. यात विविध कलाकृती, प्रयोग, मनोरंजनात्मक व्हिडिओ तयार करणे, मातीकाम, कागदकाम, गोष्टी, सामान्य ज्ञान आधारित प्रश्नोत्तरे यांचा समावेश करण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांच्या सोबतच पालकही सक्रिय बनले. पालकांच्या सहभागातून गुणवत्ता विकास साधला गेला. या उपक्रमांसोबतच व्यक्तिमत्त्व विकास साधण्यासाठी विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. त्यात चित्रकला स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, अभिवाचन स्पर्धा, रंगभरण स्पर्धा घेण्यात आल्या. राज्यस्तरीय होणाऱ्या विविध स्पर्धेत सहभाग नोंदवला. कथाकथन स्पर्धा, रंगभरण, घोषवाक्‍य स्पर्धा यातही मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले. 
ऑनलाइन प्रवेशासाठी प्रयत्न 
पटनोंदणी व शाळा बाह्य विद्यार्थी शाळेत दाखल करण्यासाठी ऑनलाईन प्रवेशासोबतच ऑफलाईन प्रवेशासाठी प्रयत्न केले. शाळेच्या पटसंख्येत वाढ होण्याच्या दृष्टीने गृहभेटी, पालक समुपदेशन व माता पालक यांचे वेबीनारचे आयोजन करण्यात आले. परिणामी जिल्हा परिषद शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि पटसंख्येत वाढ झाली, हे यामागील यश आहे, असे म्हणायला हरकत नाही. हे काम करण्यासाठी केंद्रप्रमुख सुधीर नाचणे व गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com