esakal | करमाळ्याच्या तहसीलदारांनी घेतला महत्वाचा निर्णय 
sakal

बोलून बातमी शोधा

An important decision was taken by the tehsildar of Karmala

तहसीलदारांनी असे केले बैठकीची नियोजन 
25 एप्रिलची बैठक घेण्यात आली असून या पुढे 27 एप्रिल, 29 एप्रिल, 2, 4, 6, 8, 11, 13 व 15 मे या दिवशी दुपारी 12 ते 1 दरम्यान या तहसीलदार कार्यालयात सोशल डिस्टन्स ठेवून बैठका घेतल्या जाणार आहेत. 

करमाळ्याच्या तहसीलदारांनी घेतला महत्वाचा निर्णय 

sakal_logo
By
अण्णा काळे

करमाळा (जि. सोलापूर) : करमाळा तालुक्‍यात करून रोगाचा प्रसार होऊ नये व सर्व विभागाच्या कामांमध्ये समन्वय राहावा यासाठी तहसीलदार समीर माने यांनी दर दोन दिवसाला सर्व विभागाची आढावा बैठक घेण्याचे नियोजन केले आहे. 15 मेपर्यंत घेण्यात येणाऱ्या बैठकीचे वेळापत्रक संबंधित विभागाच्या प्रमुखांना देण्यात आले आहे. 15 मेपर्यंत 10 आढावा बैठका यासाठी घेतल्या जाणार आहेत. या बैठकीला उपस्थित रहाणे सर्व विभागाच्या प्रमुखांना बंधनकारक करण्यात आले आहे. 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्‍याच्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. तहसीलदार या आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत. तहसीलदार समीर माने यांनी सांगितले की, करमाळा तालुक्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत एकही कोरोनाचा रूग्ण करमाळा तालुक्‍यात आढळला नाही. करमाळा तालुका हा पुणे, अहमदनगर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्याच्या सीमेला लागून आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना जबाबदारीने काम करावे लागत आहे. प्रत्येक विभागाला वेगवेगळी जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. काही विभागामध्ये कामात समन्वय नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रत्येक विभागामध्ये समन्वय राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून दर दोन दिवसांनी या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे नियोजन केले आहे. या सर्व बैठकी तहसील कार्यालय करमाळा येथे घेण्यात येणार आहेत. 
करमाळा तालुक्‍यात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह करमाळा, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय महिला वसतिगृह, महात्मा गांधी विद्यालय करमाळा, उपजिल्हा रुग्णालय करमाळा, साईकृपा मंगल कार्यालय गौंडरे, भारत हायस्कूल वस्तीगृह जेऊर या ठिकाणी लोकांना क्वारंटाइन करून ठेवण्यात आले आहे.