esakal | बार्शीत दरोडा! चालकास बांधून नवीन ट्रॅक्‍टर-ट्रॉलीसह 15 लाखांचा ऐवज लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

बार्शीत दरोडा! नवीन ट्रॅक्‍टर-ट्रॉलीसह 15 लाखांचा ऐवज लंपास

नवीन घेतलेला ट्रॅक्‍टर, दोन ट्रॉली, रोख पाच हजार रुपये घेऊन चोरट्यांनी एकूण 15 लाखांचा ऐवज लंपास केला.

बार्शीत दरोडा! नवीन ट्रॅक्‍टर-ट्रॉलीसह 15 लाखांचा ऐवज लंपास

sakal_logo
By
प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : बार्शी-येरमाळा रस्त्यावर पाथरीच्या पुढे दोन किलोमीटर अंतरावर पाच चोरट्यांनी ट्रॅक्‍टर चालकास थांबवून, त्याला मारहाण करून उसाच्या शेतामध्ये नेऊन बांधून ठेवले. नवीन घेतलेला ट्रॅक्‍टर, दोन ट्रॉली व रोख पाच हजार रुपये घेऊन चोरटे पसार झाले असून, बार्शी तालुका पोलिस ठाण्यात (Barshi Taluka Police Station) 15 लाखांचा ऐवज लंपास केल्या प्रकरणी पाच जणांविरोधात दरोड्याचा (Robbery) गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. ही घटना बुधवारी (ता. 13) पहाटे पाचच्या सुमारास घडली असून, संजय राठोड (रा. बिचकुलदरा तांडा, ता. वडवणी, जि. बीड) या ट्रॅक्‍टर चालकाने फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा: पोटच्या मुलानेच केला आईचा खून! बार्शी शहरातील घटना

जमखंडी येथील पडसलगी साखर कारखाना येथील ऊस वाहतूक यांच्यामध्ये करार करण्यात आला असून, त्यासाठी राठोड यांनी नवीन ट्रॅक्‍टर बीड येथून तर नवीन दोन ट्रॉली शेवरे टेंभुर्णी (ता. माढा) येथून खरेदी केल्या होत्या. टेंभुर्णी- कुर्डुवाडी- बार्शी मार्गे वडवणी येथे जात असताना पाथरीच्या पुढे दोन किलोमीटर अंतरावर रस्ता खराब व खड्डे असल्याने सावकाश ट्रॅक्‍टर चालवत असताना ट्रॉलीवरून चढून चार -पाच जण आले. एकाने राठोड यांच्याजवळ येऊन ट्रॅक्‍टर बंद करण्यास भाग पाडले. चौघांनी खाली ओढून लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली आणि जवळच असलेल्या उसाचा शेतामध्ये उचलून घेऊन गेले. त्या वेळी एकजण ट्रॅक्‍टर ट्रॉलीसह घेऊन निघून गेला.

शेतामध्ये पॅंट काढून पाय बांधले, शर्ट काढून हात बांधले तर बनियन काढून तोंड बांधले. या वेळी खिशातील रोख पाच हजार रुपये व मोबाईल घेऊन चोरटे पसार झाले. पाय स्वतःच सोडवून घेऊन दोन किलोमीटर बांधलेल्या अवस्थेत शिराळा पाटीजवळ धाब्यावर चालत आले. ढाब्यावरील व्यक्तींनी हात-पाय सोडवले तसेच भाऊ दुचाकीवर पुढे गेला होता, त्यास बोलावून घेतले. नवीन ट्रॅक्‍टर व दोन नवीन ट्रॉली एकूण 15 लाखांचा ऐवज, रोख पाच हजार, मोबाईल असा ऐवज पाच जणांनी लंपास केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे करीत आहेत.

हेही वाचा: पंढरपुरात एसटी कर्मचाऱ्याची गळफास लावून आत्महत्या!

फिर्यादीत म्हटले आहे की, चोरटे हे 25 ते 30 वयोगटातील पाचजण होते. काळ्या रंगाचे शर्ट, पॅंट, माझ्याशी मराठी व हिंदी भाषेतून बोलत होते तर आपापसात ते वेगळ्या भाषेत बोलत होते, असे संजय राठोड यांनी सांगितले.

loading image
go to top