व्यावसायिक शिक्षण कर्मचाऱ्यांचा दिवाळीत शिमगा!

व्यावसायिक शिक्षण कर्मचाऱ्यांचा दिवाळीत शिमगा!
शिक्षक
शिक्षकsakal
Updated on
Summary

वेतनाअभावी यंदा या कर्मचाऱ्यांवर ऐन दिवाळीत शिमगा करण्याची वेळ आली आहे.

माळीनगर (सोलापूर) : दिवाळी (Diwali) सुरू झाली तरीही सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) व्यावसायिक शिक्षण (Vocational Education) या अनुदानित विभागातील सुमारे 375 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार आज (बुधवारी) सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत झालेले नाहीत. त्यामुळे वेतनाअभावी यंदा या कर्मचाऱ्यांवर ऐन दिवाळीत शिमगा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या विभागाच्या सोलापूरस्थित कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभाराबद्दल शिक्षकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

शिक्षक
पोलिस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी! डिसेंबरनंतर 13 हजार पदांची भरती

जिल्ह्यात या विभागांतर्गत 26 तंत्रयुक्त अनुदानित माध्यमिक शाळा व 22 किमान कौशल्य (10+2) अनुदानित ज्युनिअर कॉलेज आहेत. यामध्ये साधारण 375 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. बुधवारी (ता. 3) या विभागाने दुपारी दीडच्या दरम्यान वेतनाचा धनादेश बॅंकेत जमा केला आहे. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांचे वेतन होण्याच्या दृष्टीने शासनाने 28 ऑक्‍टोबरलाच जिल्हा व्यावसायिक शिक्षण विभागाकडे वेतन अनुदान जमा केले आहे. तरीही सोलापूर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून त्यावर गतीने काम झाल्याचे दिसत नाही. परिणामी वेतनाअभावी या विभागातील कर्मचाऱ्यांना दिवाळी अंधारात घालवण्याची पाळी आली आहे.

खरे तर सोमवारी वसुबारसेपासून दिवाळी सुरू झाली आहे. मंगळवारी धनत्रयोदशी झाली. गुरुवारी लक्ष्मीपूजन, शुक्रवारी बलिप्रतिपदा व शनिवारी भाऊबीज हे दिवाळीचे प्रमुख दिवस आहेत. वेतन देयके वेळेत सादर करून व वेतन अनुदान शासनाकडून वेळेवर प्राप्त होऊन सुद्धा दिवाळीच्या प्रमुख दिवसांच्या आदल्या दिवशीपर्यंत या कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत. विशेष म्हणजे गुरुवारी व शुक्रवारी बॅंकांना देखील दिवाळीची सुट्टी आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवस तरी या कर्मचाऱ्यांना वेतन मिळण्याची अजिबात शाश्वती नाही. पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील या विभागातील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे पगार दिवाळीपूर्वी वेळेत झाले आहेत, मग सोलापूर जिल्ह्यातील या विभागातील कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळीपूर्वी का झाला नाही, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना पडला आहे.

जिल्ह्यातील अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील कर्मचाऱ्यांची संख्या तुलनेने जास्त असूनही त्यांचे पगार दिवाळीपूर्वी झाले. मात्र, याच शाळांमध्ये काम करणाऱ्या व्यावसायिक शिक्षण विभागातील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे दिवाळीपूर्वी वेळेत पगार न होण्यास जबाबदार कोण? असा सवाल या कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे. वरिष्ठांनी या गंभीर प्रकरणाची त्वरित दखल घेऊन संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी, अशी अपेक्षा या विभागातील कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

शिक्षक
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदांची भरती !

अनुदान वेळेवर येत नाही. त्यामुळे पगार पुढे गेले आहेत. बॅंकेला आजच चेक दिला आहे. दोन-तीन दिवस तरी पगारास लागतील.

- प्रदीप दराडे, कार्यालयीन अधीक्षक, जिल्हा व्यावसायिक शिक्षण विभाग, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shaktipeeth Highway Protest raju shetti in solapur
Devotees Shocked in Pandharpur After Claims of Paid Vithal Darshan Surface
Cattle Transport Truck Meets With Accident in Solapur’s Mohol Taluka
ATM Pulled Out and Fled in Car; Major Theft Incident Shocks Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com