आठवीत शिकणारी वधू विवाहापूर्वीच पोलिसांत! कथा पंढरीतील बालविवाहाची

Child-Marriage
Child-Marriageesakal
Summary

विवाह होणार असल्याची खात्री होताच दबा धरून बसलेल्या पोलिस व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून वधूला ताब्यात घेतले.

सोलापूर: पंढरपूर तालुक्‍यातील एका गावातील मुलीचा विवाह शुक्रवारी (ता. 17) दुपारी साडेबाराच्या सुमारास होणार होता. त्याची माहिती मिळताच जिल्हा बाल संरक्षण समितीचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी वऱ्हाडी म्हणून चौकशी केली. विवाह होणार असल्याची खात्री होताच दबा धरून बसलेल्या पोलिस व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून वधूला ताब्यात घेतले.

Child-Marriage
गणेशमुर्ती विसर्जनाची 'या' ठिकाणी सोय! गर्दी नकोच, हालचालींवर पोलिसांचा वॉच

नवरा मुलाच्या घरासमोर छोटासा मंडप मारण्यात आला होता. वस्तीवर विवाह होणार असल्याने वधू व वराकडील मंडळींनी त्याची गोपनियता पाळली होती. त्यांनी केवळ जवळील नातेवाईकांनाच बोलावले होते. परंतु, जिल्हा बाल संरक्षण समितीला चाईल्ड लाईनवरून बालविवाहाबद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर पंढरपूरचे बाल विकास प्रकल्प अधिकारी सरडे, संरक्षण अधिकारी घाडगे, निर्भया पथक प्रमुख श्रीमती क्षीरसागर, चाईल्ड लाईनचे स्वामी यांचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यांच्यासोबत पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी व अंमलदारही उपस्थित होते.

Child-Marriage
सोलापूरकर असुरक्षित! साडेबारा लाख लोकसंख्येच्या शहरात अवघे 20 CCTV

दरम्यान, त्यांनी विवाहाचा अंदाज घेतला आणि त्यांच्या घरी धाव घेतली. सुरवातीला पथकाने मुलीचा शोध घेतला. परंतु, त्यांना वधू दिसलीच नाही. नवरी मुलीच्या वडिलांनी हा विवाह नसून साखरपुडा असल्याचे समितीला सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्याची भाषा करताच वूध पित्याने सर्व हकीकत सांगितली. मुलीला बालगृहात दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. विजय खोमणे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे, परिविक्षा अधिकारी दिपक धायगुडे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अनुजा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Child-Marriage
बनावट कागदपत्रे तयार करून जमीन हडपण्याचा प्रकार! गुन्हा दाखल

मुलीने सोडली होती आठवीतून शाळा

पालकांचे हातावरील पोट, मुलीने आठवीतून शाळा सोडल्यानंतर दोन वर्षांपासून ती घरीच होती. पालकांनी मुलीच्या मामाच्या मुलाशी तिचा विवाह ठरविला. साखरपुडा, हळदी व विवाह एकाच दिवशी करण्याचे त्यांचे ठरले होते. साध्या पध्दतीने विवाह होणार असल्याने मंडपही मोजकाच मारलेला होता. परंतु, जिल्हा बाल संरक्षण समितीच्या सतर्कतेमुळे तो बालविवाह थांबविण्यात आला. दरम्यान, समितीचे अधिकारी त्याठिकाणी गेल्यानंतर मुलगी दिसत नव्हती. त्यांनी तिला शेजारील चुलत भावाच्या घरी लपवून ठेवले होते. मुलीला निर्भया पथकाच्या माध्यमातून बाल कल्याण समितीसमोर हजर केले. त्यांनी तिला बालगृहात दाखल केले. वधू-वराच्या पालकांचे जबाब नोंदवून व त्यांना समज देऊन पोलिसांनी सोडून दिल्याचेही सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com