पालकांमुळे 5 वर्षाच्या चिमुकलीसह 13 वर्षांच्या मुलाला कोरोना

corona
coronae sakal
Updated on
Summary

कोरोनाची लक्षणे असतानाही कुटुंबातील सदस्य बिनधास्तपणे घरात मुक्‍तपणे वावरतात.

सोलापूर : कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेत बाधितांमध्ये सर्वाधिक बालकेच (children) असतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर पालकांनी त्यांच्या कुटुंबातील बालकांच्या आरोग्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. तरीही, पालकांना त्याचे गांभीर्य समजले नसून सोरेगाव हद्दीतील एका कुटुंबाचे पालक पोलिस तर त्यांची पत्नी नर्स आहे. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या पाच वर्षाच्या चिमुकलीला तर 13 वर्षाचा मुलगा व 65 वर्षांवरील महिलेला कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. (in solapur, small children are also infected with corona)

corona
सोलापूर आयएमएने कोरोना लसीकरणाचे केले जोरदार स्वागत 

शहरात जवळपास तीन लाखांपर्यंत बालकांची संख्या असून बालरोगतज्ज्ञांची संख्या शंभरपर्यंत आहे. महापालिकेकडे केवळ चार बालरोगतज्ज्ञ आहेत. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा भयावह अनुभव पाठिशी असताना आणि तिसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविलेली असतानाही पालकांनी अजूनही त्याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. कोरोनाची लक्षणे असतानाही कुटुंबातील सदस्य बिनधास्तपणे घरात मुक्‍तपणे वावरतात.

corona
सोलापूर जिल्ह्यातील  प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना पश्‍चात बाह्यरुग्णसेवा सुरु 

ग्रामीण भागात एकाच कुटुंबातील सर्वच सदस्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तर शहरातही काही दिवसांपूर्वी असेच प्रकार घडले आहेत. समुह संसर्गामुळेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रूग्ण व मृतांची संख्या वाढल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे. या पार्श्‍वभूमीवर आपल्यामुळे मुलांना कोरोनाची बाधा होऊ नये आणि त्यांच्या माध्यमातून घरातील वयस्कर व्यक्‍तींना धोका होऊ नये म्हणून खबरदारीचे आवाहन केले जात आहे.

corona
झेडपी सीईओ दिलीप स्वामी म्हणाले, सोलापूर ग्रामीणमधील विक्रेत्यांना कोरोना चाचणी बंधनकारक 

प्रभाग 26 मध्ये सर्वाधिक समुह संसर्ग

प्रियंका नगरातील एका पोलिस कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर नर्स म्हणून काम करणारी त्यांची पत्नी, त्यांची आई, लहान मुलगा व मुलगी पॉझिटिव्ह आली. तर काही दिवसांपूर्वी रत्नमंजिरी नगरातील एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यात 16 ते 18 वयोगटातील दोन मुले, त्यांचे आई-वडिल पॉझिटिव्ह होते. रोहिणी नगरातील पाच वर्षीय मुलीला कोरोना झाला होता, परंतु तिची आई निगेटिव्ह आली होती. तसेच कित्तुरचन्नमा नगरातील एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यातही दोन मुलांचा आणि त्यांच्या आईचा समावेश होता. शहरातील 26 क्रमांकाच्या प्रभागात सर्वाधिक समुह संसर्गाचे प्रकार वाढले असून बाधितांमध्ये बालकांचाच सर्वाधिक समावेश असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करूनही त्याचे तंतोतंत पालन न करता ते बाहेरून आल्यानंतर मुलांच्या संपर्कात येत असल्यानेच असे प्रकार वाढत असल्याचेही त्यांचे मत आहे. (in solapur, small children are also infected with corona)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pandharpur
One-Sided Obsession Ends in Murder; Family Loses Its Sole Breadwinner
Solapur
Dr. Shirish Valsangkar family's
Marathi News Esakal
www.esakal.com