
सोलापूर : सोलापुरातील ट्रेसिंग, टेस्टींग वाढवले गेले आहे. त्यामुळे सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त दिसत आहे. मात्र नागरिकांनी यावरुन घाबरुन जाऊ नये. सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी सोलापूरच्या नागरिकांची साथ महत्वाची आहे, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
कोरोना विषाणूच्या प्रसाराचा अटकाव करण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथील विश्रामगृहात बैठक घेतली. बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, दीपक तावरे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते. बैठकीत प्रारंभी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शहराच्या ठराविक भागातच कोरोना विषाणूने बाधित झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे प्रशासनाने या विशिष्ठ भागावरच लक्ष केंद्रीत केले आहे. येथे थर्मल स्कॅनर आणि पल्स ऑफिसमीटरच्या सहाय्याने नागरिकांचे सर्व्हेक्षण केले जात आहे, असे सांगितले.
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
यावर पालकमंत्री भरणे यांनी सांगितले की, नागरिकांचे सर्व्हेक्षण करणे, तपासणी करणे, कंटेनमेंट झोनमधील ज्येष्ठ नागरिकांचे अलगीकरण करणे असे उपाय करा. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करा. जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन सोलापूरकरांची पूर्ण काळजी घेत आहेत. मात्र प्रशासनाला सोलापूरकरांनी साथ द्यायला हवी, असे ते म्हणाले. यावेळी पोलीस उपायुक्त बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे,उप जिल्हाधिकारी किशोर पवार, हेमंत निकम, सचिन ढोले, पंढरपूरचे नगरपरिषद मुख्यधिकारी अनिकेत मानोरकर, जिल्हा उत्पादन शुल्क अधिक्षक रवींद्र आवळे, डॉ. संतोष नवले, डॉ. प्रदीप ढेले, डॉ भीमाशंकर जमादार आदी उपस्थित होते.
आषाढीबाबत स्थिती पाहून निर्णय
आषाढी सोहळ्याचा निर्णय जूनमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर मध्ये होणाऱ्या आषाढी सोहळ्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची स्थिती पाहून आषाढी सोहळा बाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे आजच्या बैठकीत ठरले असल्याची माहितीही पालकमंत्री भरणे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.