
Solapur : मध्य रेल्वेत लोको पायलटांच्या २२ हजार जागा रिक्त असल्यामुळे लोको पायलटांना आजारपणातही सुटी घेणे कठीण झाले आहे. रेल्वेगाडीबरोबर मुख्यालय सोडून बाहेर गेलेल्या लोको पायलटांना अनेक वेळा ४० ते ७२ तासापर्यंत बाहेर राहावे लागत आहे. यामुळे लोको पायलटांचे हाल सुरू आहेत.