cooler.jpg
cooler.jpg

उन्हाळ्यासाठी कुलर, फ्रीज व एसीला वाढतेय मागणी

सोलापूर ः उन्हाळ्याच्या तोंडावर बाजारात मोठ्या प्रमाणात कुलर, फ्रीज व एसीची विक्री होत असते. या वर्षीच्या हंगामात आधीच कोरोनामुळे फटका बसल्यानंतर कच्च्या मालावर चीनवर अवलंबुन राहावे लागत असल्याने या वस्तुच्या किंमती 20 ते 25 टक्कयांनी वाढल्या आहेत. 
उन्हाळ्यात शहरामध्ये डेझर्ट कुलर व ब्रॅंडेड कुलर हे दोन प्रकार उपलब्ध असतात. डेझर्ट कूलर स्थानिक भागात तयार होतो. त्यामध्ये कॉपरचे दर वाढले आहेत. तसेच लोखंडाचे दर देखील वाढले आहेत. त्याचा फटका बाजाराला बसला आहे. कूलर मध्ये असलेल्या मोटारीच्या किमती वाढल्या आहेत. तसेच मजूरीचे दर देखील वाढल्याने किमंत वाढीशिवाय पर्याय नाही. ब्रॅंडेड कूलरच्या बाबतीत देखील हीच स्थिती झाली आहे. 
मुळातच कोरोनाच्या धास्तीने बाजार विस्कळीत झाला आहेत. त्यात पून्हा ग्राहक देखील अद्याप कमीच आहे. मात्र उन्हाच्या चटक्‍यासोबत कुलरची खरेदी वाढणार आहे. व्यापाऱ्यांनी गरजेपूरता माल आणला आहे. ब्रॅंडेड कुलरमध्ये काही कंपन्याचा पुरवठा थोडासा विस्कळित झाला आहे. 
एसीच्या बाबतीत देखील भाव वाढले आहेत. एसीमध्ये काही पार्ट चीनमधून तयार होऊन येतात. त्याचा उपयोग केला जातो. त्याचेही पार्ट महाग झाल्याने अडचण झाली आहे. एसीच्या किमतीमध्ये 10- 15 टक्के वाढ झाली आहे. फ्रीजच्या बाबतीत महागाईचा फटका बसला आहे. कॉम्प्रेसरच्या किमतीत वाढ झाली आहे. अगदी फ्रीजचा समोरील भागाचा दरवाजा देखील चीनमधूनच येतो. तेथून माल न आल्यास पुढील फ्रीज निर्मितीची कामे होत नाहीत.फ्रीजच्या काही ब्रॅंडचा पुरवठा मागणी केल्यानंतर देखील मिळत नाही. 
या सर्व स्थितीत आता ईंधन दरवाढीची भर पडणार आहे. ईंधनाचे भाव वाढल्याने त्याचे परिणाम आता वाहतूक खर्चावर येणार आहे. वाहतूक खर्च वाढल्यास या सर्व वस्तूच्या किमंतीत आणखी काही टक्‍क्‍याची वाढ होणार आहे. 

इंधन दरवाढीचे परिणाम
कोरोनाच्या काळानंतर अजूनही बाजार सावरलेला नाही. सर्वच वस्तुचे भाव वाढले आहेत. मुळातच चीनच्या परिणामासोबत आता इंधन दरवाढीचे परिणाम दिसत आहेत. ग्राहक कोरोनाच्या धास्तीने अद्याप खरेदीत उतरत नाही. 
- रविंद्र कोळी, सिध्देश्‍वर इंटरप्रायजेस, सत्तरफूट रोड, सोलापूर 

लवकरच या स्थितीत सुधारणा
कुलर, एसी व फ्रीजच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली आहे. कच्च्या मालाचे भाव वाढल्याने ही स्थिती उदभवली आहे. लवकरच या स्थितीत सुधारणा होईल. 
- रविंद्र उपलंची, अमर मोबाईल शॉपी, सत्तर फूट रोड, सोलापूर  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com