KARMALA ASSEMBLY
KARMALA ASSEMBLYsakal

Solapur : करमाळ्यात इच्छुकांची संख्या मोठी; पक्ष मात्र अस्पष्ट

Solapur : करमाळ्यातून पुन्हा एकदा आमदार होण्यासाठी विद्यमान आमदार संजय शिंदे व माजी आमदार नारायण पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
Published on

करमाळ्यातून पुन्हा एकदा आमदार होण्यासाठी विद्यमान आमदार संजय शिंदे व माजी आमदार नारायण पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आमदार शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तेत असूनदेखील ते अद्याप राष्ट्रवादीकडून लढण्यास इच्छुक नसल्याचे चित्र आहे. तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्याने त्यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निश्चित मानली जात आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघात आमदार शिंदे, माजी आमदार पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, भाजपच्या रश्मी बागल, दत्तकाला शिक्षण संस्थेचे प्रा. रामदास झोळ, शिवसेना शिंदे गटाकडून महेश चिवटे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत भूमिका स्पष्ट केल्या आहेत. याशिवाय अन्य इच्छुकांची संख्यादेखील मोठी आहे. करमाळ्यात इच्छुकांची संख्या जरी मोठी असली तरी यातील अनेकजण कोणत्या पक्षाकडून लढणार हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

- अण्णा काळे

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com